Tamso ma... | तमसो मा...

Tamso ma... | तमसो मा...

'पंकज कुरूलकर हे मराठी कथाविश्वातील एक ठळक नाव. सामान्य वाचकापासून समीक्षकापर्यंत सर्वांचे लक्ष त्यांच्या कथेने वेधून घेतले, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कुरूलकरांच्या कथेतून प्रकट होणारे बदलत्या काळाचे भान. काळ बदलतो तशी माणसे बदलतात, त्यांचे जीवनमान बदलते, प्रश्नही बदलतात. या प्रश्नांच्या उत्तरांत बदलत्या काळाची प्रतिबिंबे असतात. कुरूलकर यांच्या संवेदनशील लेखणीला ती दिसतात. ती न्याहाळता-न्याहाळता त्यांची कथा आकार घेते. ती शब्दरूप घेत असताना स्वत: प्रश्नांच्या भोव-यात प्रवेश करते आणि वाचकालाही अलगद त्यात ओढून नेते. तो नकळत त्यात गुंतत जातो... माणसाच्या आसपासचा समाज, परिस्थिती, अवकाश त्याला चार भिंतींत कोंडू पाहत असतानाही कुरूलकरांच्या कथेतील पात्रे आशादायी निळाईचा ध्यास धरताना दिसतात. त्यांची ही झुंज नुसती वाचण्यासारखी नसते, तर जगण्याचा अर्थ उलगडू पाहणारी असते... '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००१
सद्य आवृत्ती : सप्टेंबर २००१
मुखपृष्ठ : पुंडलिक वझे'

M.R.P ₹ 125
Offer ₹ 112.5
You Save
₹ 12.5 (10%)
Out of Stock

More Books By Pankaj Kurulkar | पंकज कुरुलकर