Shidori 1 | शिदोरी भाग १

Shidori 1 | शिदोरी भाग १

अणुवैज्ञानिक म्हणून प्रसिध्द असणारे सुरेश हावरे 

शिर्डीच्या श्री साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षही आहेत

आणि अनेक नवोद्योगांना प्रेरणा देणारे यशस्वी उद्योजकही आहेत.

विज्ञानातील विवेक आणि श्रद्धेतील सेवाभाव यांची 

सुयोग्य सांगड घातली की, सत्कार्याला कसे असंख्य धुमारे फुटतात,

याचे त्यांनी घडवलेले दर्शना कल्पक तर आहेच, पण 

प्रयत्नवादाला प्रोत्साहक असे पाठबळ देणारेसुध्दा आहे.

गेल्या काही वर्षांत विविध ठिकाणी, निरनिराळ्या प्रसंगी

त्यांनी केलेल्या भाषणांमुळे अनेकांना यशाचा मूलमंत्र गवसला.

कित्येकांना जीवनातील सुखासमाधानाची गुरुकिल्ली मिळाली.

ज्यांनी ज्यांनी ही भाषणे ऐकली, ते ते सारे प्रभावित झाले.

त्या भाषणांमध्ये विखुरलेले संस्कारधन संकलित स्वरूपात 

अधिक व्यापक प्रमाणावर उपलब्ध होण्याची गरज जाणवली.

समाजातल्या धडपडणाऱ्या तरूणांना पुढील वाटचालीत 

दिलासा देऊ शकेल, अशी ही 'शिदोरी' म्हणूनच प्रसिध्द होते आहे. 

बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे सुरेश हावरे यांचे 

अनुभवांतून साकारलेले  ही प्रेरणादायी बोल. 

विधायक वातेवरच्या असंख्य पांथस्थांना 

ही 'शिदोरी' खचितच मोलाची वाटेल. 


ISBN: 978-93-86628-76-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जून २०१९
  • मुखपृष्ठ : राजू पवार
  • राजहंस क्रमांक : F-03-2019
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)