Shahana asashil tar lihu nakos... | शहाणा असशील तर लिहू नकोस ...
शहाणा असशील तर कधी लिहू नकोस.
लिहिलेस तर कोणाला वाचून दाखवू नकोस,
पैसा असेल तर पोटभर खा,
नाहीतर उपाशी राहून झाडाप्रमाणे वाळून जा;
पण लेखणी आणि कागद यांच्याशी संबंध येऊ देऊ नकोस....
माझा बाप सतत लिहीत असे आणि
सकाळी लोकांमध्ये वाटत असे...
नंतर कायकाय लिहिले त्याच्या सुरळ्या घेऊन
परवा उघड्या तलवारी घेतलेले राक्षसासारखे सैनिक आले.
त्यांनी त्याचे सारे कागद जाळून टाकले व
बापाला घेऊन निघून गेले.
माझा बाप इतका भयंकर आहे हे मला माहीतच नव्हतं.
तो अगदी जवळून चालला तरी अंगणातल्या चिमण्यादेखील
कधी भीतीने बाजूला होत नसत.
तो लिहीत असताना खिडकीवर पारवा घुमू लागला,
तरी त्याला हुसकवण्याऐवजी तो लिहिणे थांबवून स्वस्थ बसे.
परंतु असा हा माणूस म्हणे भयंकर होता,
कारण त्याच्यापासून राजसत्तेला धोका होता.
जी. ए. कुलकर्णी
'इस्किलार'मधून
ISBN: 978-81-19625-98-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०२६
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : C-02-2026 (1244)