Sattechya Padachhayet | सत्तेच्या पडछायेत
'यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर. ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र. सत्तेच्या पडछायेत '
- 'Pages: 356 Weight:460 ISBN:978-93-86628-87-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:नोव्हेंबर 2019 पहिली आवृत्ती:नोव्हेंबर 2019 Illustrator:कमल शेडगे'