Sarakari Musalman | सरकारी मुसलमान

Sarakari Musalman | सरकारी मुसलमान

मुस्लिम नागरिक सरकारी अधिकारी बनतात आणि नियमानुसार कामगिरी बजावतात, त्यावेळी त्यांना बन्याचदा ‘सरकारी मुसलमान’ असं काहीशा हेटाळणीच्या सुरात म्हटलं जातं. असं का? या पुस्तकात लेफ्टनंट जनरल जमीर उद्दिन शाह यांनी या चक्रावून टाकणाऱ्या ‘पदवी’चा खुलासा केलेला आहे. लेखकाच्या ७० वर्षांच्या समृद्ध आयुष्याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यांच्या कुटुंबानंच चालविलेल्या मदरशामध्ये त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर ते बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. सैन्यातली त्यांची कारकीर्द चाळीस वर्षांची झाली. १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला. त्याखेरीज गुजरातमध्ये सन २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळितकांडानंतर उसळलेल्या दंगली शमविण्याची जबाबदारी सैन्याच्या ज्या डिव्हिजनला दिली गेली, तिचे कमांडर शाह हे होते. त्याबद्दलच्या प्रकरणामध्ये लेखकांनी पोलिस, निमलष्करी दल आणि सेना दल यांच्या भूमिकांबद्दलची त्यांची मतंही स्पष्टपणे मांडली आहेत.

  • Book Author ले. जनरल (निवृत्त) जमीर उद्दिन शाह अनुवादक शिरीष सहस्रबुद्धे Book Name सरकारी मुसलमान Illustrator शेखर गोडबोले, राजू देशपांडे पहिली आवृत्ती नोव्हेंबर २०२१ सद्य आवृत्ती नोव्हेंबर २०२१
M.R.P ₹ 260
Offer ₹ 234
You Save ₹ 26 (10%)