Rajiv Sane Yanchi sulattapasani | राजीव साने यांची सुलटतपासणी
'राजीव साने हा प्राणी आहे तरी कोण? हे काय अजब रसायन आहे? इतक्या विविध विद्याशाखांमध्ये स्वतःला सुचलेली नवी ताजीतवानी सैद्धांतिक मांडणी हा कसा काय करू शकतो? आणि तीही आजच्या प्रश्नांपाशी आणून भिडवू कशी शकतो? त्याचा इझम कोणता? पक्ष कोणता? कोणती बाजू घेतो तो? आज निरनिराळ्या मुद्यांवर त्याच्या भूमिका काय काय आहेत? असे अनेक प्रश्न राजीव साने यांच्या वाचकांना आणि इतरांनाही पडतात. या प्रश्नांच्या उत्तरांचे काही पैलू राजीव साने यांच्या पुस्तकांमधून अन् इतर अनेक लेखातून वाचकांसमोर आले आहेत, पण त्यांच्या विचारातील आणि व्यक्तित्वातील अनेक पैलू समोर न आलेलेही आहेत. त्यांच्यासोबतच्या दिलखुलास गप्पांमधून अशा न उलगडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. अजय ब्रम्हनाळकर आणि संजीवनी चाफेकर घेत आहेत- राजीव साने यांची सुलटतपासणी '
- बाईंडिंग :कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ X ८.५
- पहिली आवृत्ती:ऑगस्ट २०१७
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'