
Parikrama narmadechi | परिक्रमा नर्मदेची
'नारायण आहिरे यांच्या मनात बालपणीच नर्मदा परिक्रमेबद्दल कुतूहल जागं झालं,
या कुतूहलानं हळूहळू ध्यासच घेतला, नर्मदा परिक्रमा झालीच पाहिजे.
प्रत्यक्षात मात्र त्यांनी साठीनंतर परिक्रमा केली. त्यांच्या दृष्टीनं,
प्राचीन काळी जिच्या किना-यावर सतत यज्ञयागाची
धूम्रवलयं उठत होती, ती नर्मदा अगदी पवित्र नदी आहे.
तिच्या परिसरात मोठमोठी राज्यं होऊन गेली.
कवी-तपस्वी,योगी-त्यागी-त्यागी-भोगी नर्मदेच्या काठी वास्तव्याला होते.
नर्मदा परिक्रमा म्हणजे सुखद आनंदयात्रा आहे, पवित्र तीर्थयात्रा आहे
आणि कसोटी पाहणारी साहसयात्रा आहे. या परिक्रमेतले अनुभव
इतरांना कथन करण्याच्या ओढीने हे लेखन केले आहे.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २०१२
- मुखपृष्ठ : कमल शेडगे
- राजहंस क्रमांक : E-03-2012