मध्ययुगीन मराठी साहित्य - एक पुनर्विचार | Madhyayugin Marathi Sahitya - Ek punarvichar
'हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून मराठीचे प्रोफेसर आणि पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. श्री.रं. कुलकर्णी हे मध्ययुगीन मराठी वाडमयाचे चिकित्सक संशोधक आणि गाढे अभ्यासक आहेत. ‘नाथांचा भागवतधर्म’, ‘प्राचीन मराठी हस्तलिखिते : संशोधन आणि संपादन’ इत्यादी त्यांचे ग्रंथ त्यांच्या अभ्यासूपणाची आणि मुख्य म्हणजे संशोधकीय प्रज्ञाप्रतिभेची साक्ष देणारेच आहेत. डॉ.श्री.रं. कुलकर्णी यांचा एकूण सर्वच अभ्यास शास्त्रशुद्ध नवीनतम प्रमेये मांडणारा आणि साहित्याचा सांस्कृतिक अनुबंध मानणारा असा आहे; आणि प्रस्तुत ‘मध्ययुगीन मराठी साहित्य : एक पुनर्विचार’ हा ग्रंथही याला अपवाद नाही. “काल, परिस्थिती, सांस्कृतिक परंपरा, समाजजीवन आणि साहित्य यांचे परोपजीवित्व मध्ययुगीन मराठी साहित्यात जेवढे भक्कमपणे निदर्शनास येते, तेवढे अन्य कालखंडात क्वचितच आढळेल”, या आपल्या गृहितकाचाच धांडोळा लेखकाने संपूर्ण ग्रंथभर कसोशीने घेतला आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सास्कृतिक स्थित्यंतरे आणि साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात घडून येणारी परिवर्तने यांचा परस्परसंबंध व आंतरक्रिया तपासून डॉ.श्री.रं.कुलकर्णी यांनी येथे नवसिद्धान्ताची प्रस्थापना केलेली आहे. मराठी वाड्.मयाच्या अभ्यासक्षेत्रात मूलभूत भर घालणारा हा ग्रंथ अभ्यासकांना समृद्धच करील. डॉ. द. दि. पुंडे '
- 'Pages: 230 Weight:0 ISBN:978-81-7434-044-3 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 1995 पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 1995 Illustrator:सतीश देशपांडे'