Manatale kahi, kahi myanatle | मनातले काही, काही म्यानातले

Manatale kahi, kahi myanatle | मनातले काही, काही म्यानातले

'जीवन जगताना माणूस सृष्टीमधला निसर्ग, त्यातील वनस्पती-प्राणी यांच्यासह पृथ्वीवरची इतर माणसं यांच्याशी घट्टपणे विणला गेलेला असतो. त्यामुळेच बदलत्या समाजजीवनात चांगल्या गोष्टी वाचवण्यासाठी अन् वाईट गोष्टी थोपवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागेल. त्या संघर्षात म्यानातली शस्त्रं बाहेर काढावी लागतील, पण ही शस्त्रं वेगळी असतील. कवीच्या म्यानात आहेत अशीच आगळीवेगळी शस्त्रं. प्रदूषण रोखायचं, तर पर्यावरण-रक्षणाची कुदळ अन् वृक्षसंवर्धनाचं फावडं. कुटुंबव्यवस्था सांधायची; तर नाती घट्ट, बळकट करणारं प्रेमाचं, आपुलकीचं काँक्रीट. इंटरनेटचे दुष्परिणाम रोखायचे, तर विवेकाचा जागर. राजकीय विसंगतीचा प्रश्न सोडवायचा, तर सारासार विचाराचं उत्तर. चंगळवाद नाकारायचा, तर जीवनशैली बदलण्याचा निर्धार. प्रेम, मनातली स्पंदनं, व्यवहाराची जगरहाटी, जोडीला भविष्यात येऊ घातलेले बदल आणि त्यामुळे व्यामिश्र सामाजिकतेची अन् वैयक्तिक भावजीवनाची, अस्तित्वाची होऊ पाहणारी लढाई - या गाभ्यातून उमटलेल्या कविता म्हणजे मनातले काही, काही म्यानातले... '

ISBN: 978-81-7434-968-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:जुलै २०१६
  • सद्य आवृत्ती:जुलै २०१६
  • मुखपृष्ठ : मोहन जाधव'
M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save ₹ 10 (10%)
Out of Stock