Mala Nisatlach Pahije | मला निसटलंच पाहिजे
'रशियाच्या स्टॅलिनच्या जुलमी राजवटीचा काळ. कामधंद्यानिमित्त रशियात राहिलेल्या परदेशी नागरिकांवरही अनन्वित अत्याचारांची आवळमिठी. स्लाव्होमिर राविझ हा असाच 24 वर्षांचा निरपराध पोलिश लेफ्टनंट. १९३९ साली रशियन गुप्तहेरांनी त्याला हेरगिरीच्या आरोपावरून २५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याची रवानगी झाली उत्तर सैबेरियातल्या एका तुरुंग तळावर. मग त्यानं आपल्याचसारखे ६ सवंगडी जमवले आणि पलायन केलं. गोबीचं वाळवंट, तिबेट आणि हिमालय पार करीत ४ooo मैल अंतर काटून ते भारतात आले. सगळेजण नव्हे. पण वाचलेल्यांत स्लाव्होमिर होता. या निरपराध युद्धकैद्यांची सपशेल खोटी वाटावी अशी खरी पलायन-साहसकथा! '
ISBN: 978-81-7434-455-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २००९
- सद्य आवृत्ती : जून २०१६
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'