Majhi Jeevan Kahani: Helan Kelar | माझी जीवन कहाणी: हेलन केलर
विसाव्या शतकावर आपल्या अलौकिक कार्यानं आणि
व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा ठसा उमटला, त्यांमध्ये
हेलन केलर ह्यांचं नाव अग्रगण्य आहे. अगदी लहानपणीच
एका आजारपणात त्यांची दृष्टी गेली. तरीही अंधत्व, मुकेपणा
आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी
आपलं आत्मनिर्भर स्वत्व शोधलं. पुढे हेलन केलर बोलायला
तर शिकल्याच पण व्याख्यानंही देऊ लागल्या. वक्तृत्व,
पत्रकारिता, साहित्य आणि अंधकल्याण अशा चौफेर कामगिरी
त्यांनी बजावली. त्यामुळेच जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलन
केलर हे केवळ एक नाव नाही तर अंधारातून प्रकाशाकडे
नेणारी एक स्फूर्तिज्योत आहे. त्यांच्या जीवनीतल्या
शिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हे
आत्मकथन – ‘माझी जीवनकहाणी !
ISBN: 978-81-7434-019-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९९४
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०२१
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : H-01-1994