Kavitayan | कवितायन

Kavitayan | कवितायन

नवकवी मानल्या जाणा-या विंदा करंदीकरांनी अन्य नवकवीपेक्षा वेगळी अशी विज्ञाननिष्ठ वास्तववादी कविता प्रथमच लिहिली. 'इहवादाचा स्वीकार आणि पारंपारिक आध्यात्मिक मूल्य व्यवस्थेला दिलेले प्रामाण्य यांत आपले जीवन दुभंगलेले आहे. आपल्या अनेक समस्यांचा उगम या दुभंगलेपणातच आहे. म्हणून पारंपारिक आध्यात्मिक मूल्यांना नाकारून इहवादाबरोबरच इहवादी मूल्य व्यवस्थेचा स्वीकार केल्याशिवाय आपले जीवन सुसंगत आणि अर्थपूर्ण बनणार नाही,' या जाणिवेतून त्यांच्या सामाजिक कवितेचा जन्म झालेला आहे. वैज्ञानिक इहवादी भूमिकेतून लिहिलेली स्त्रीपुरुषांमधील शृंगारसंबंधाविषयक कविता हे विंदांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या आधारे स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या नैसर्गिक जीवनोद्दष्टींचा वेध घेतला आहे. विंदा स्त्रीकडे विश्वातील सर्जनशक्तीचे प्रतीक म्हणून पाहतात. या जगतात स्त्रीचे अस्तित्त्व हेच प्राथमिक असून तिच्या अस्तित्त्वामुळेच पुरुषालाही 'पुरुष' म्हणून अस्तित्त्व लाभले आहे. विंदांच्या कवितेमुळे मराठी कवितेत या जाणीवा प्रथमच साकार झाल्या, त्यामुळे त्यांच्या कवितेला असाधारणत्व लाभले आहे. आततायी अभंग, संहिता, मुक्त सुनीते, तालचीत्रे, सूक्ते, गजल, निर्वाणीची गजल, विरूपिका असे काव्यारुपांचे अनेक प्रयोग विंदांनी केले, त्यामुळे मराठी काव्याक्षेत्र समृद्ध झाले आहे. विंदांच्या काव्य वैशिष्ट्यांची सांगोपांग आणि मार्मिक मीमांसा करणारा, काव्यरसिकांना, काव्याच्या अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणारा ग्रंथ -


M.R.P ₹ 490
Offer ₹ 441
You Save
₹ 49 (10%)