
Kaljayi kumar gandharva (Marathi) | कालजयी कुमार गंधर्व (मराठी)
'भारतीय शास्त्रीय कंठसंगीताच्या क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची कधीही
न पुसता येणारी ठाशीव मुद्रा उमटविणारे श्रेष्ठ वाग्गेयकार, संगीतकार व
गायक म्हणजे कुमार गंधर्व !
त्यांच्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाचा, प्रयोगशीलतेचा आणि वैचारिकतेचा शोध
घेण्याचा प्रयत्न कालजयी कुमार गंधर्व या मराठी आणि हिंदी-इंग्रजी (संयुक्त)
अशा द्विखंडात्मक ग्रंथामध्ये केला आहे.
प्रत्येक खंड स्वतंत्र आहे. यामध्ये समाविष्ट केलेले लेख
वेगवेगळे आहेत. भाषांतरित नाहीत.
कोणाही रसिकाला कधीही, कोणतेही पान उघडून वाचावासा वाटेल,
असा हा संग्राह्य ग्रंथ आहे.
ISBN: 978-81-7434-851-7
- बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
- आकार : ६.७५" X ९.५"
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०१४
- सद्य आवृत्ती : मार्च २०१५
- मुखपृष्ठ व मांडणी : विनय जैन
- तांत्रिक संस्करण : शेखर गोडबोले
- सुलेखन : दिलीप चिंचाळकर
- छायाचित्रे : अविनाश पासरिचा , रघु राय, चंदू नाफडे, भालू मोंढे, रमेश पेंडसे, सतीश पाकणीकर, भारत भवन ट्रस्ट (भोपाळ), भानुकूल (देवांसा) येथील संग्रहातून
- राजहंस क्रमांक : K-01-2014