Kafkacha "Metamorphosis" | काफ्काचं 'मेटॅमॉर्फोसिस'

Kafkacha "Metamorphosis" | काफ्काचं 'मेटॅमॉर्फोसिस'

फ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक. 

त्याच्या ‘मेटॅमॉर्फोसिस’चे भाषांतर उपलब्ध करून द्यावे, याकरता 

डॉ. सुहास भास्कर जोशी हे अभिनंदनास पात्र आहेत. 

त्यांनी केलेले भाषांतर सुबोध आहे. मूळ कथेची आकृती आणि प्रकृती 

भाषांतरात उत्तम रीतीने आली आहे. प्रस्तुत भाषांतर मराठी वाचकांना 

एका अपूर्व व महान साहित्यकृतीच्या वाचनाचे समाधान देणारे आहे. 

याशिवाय या ग्रंथात काफ्काचा जीवनपट आणि त्याचे लेखन, ‘मेटॅमॉर्फोसिस’चे 

आस्वादक विश्लेषण, त्याच्याशी नाते सांगणा-या साहित्यकृतींचा परामर्श यांचा 

समावेश केलेला आहे. थोडक्यात, या ग्रंथाचा पैस मोठा आहे. ग्रंथाच्या शेवटी 

सुहास भास्कर जोशी म्हणतात, ‘काफ्का आणि आणि ‘मेटॅमॉर्फोसिस’ला 

मरण नाही, किंबहुना ‘मेटॅमॉर्फोसिस’चे गारूड अजूनही कमी झालेले नाही. 

सुहास जोशींनी अत्यंत परिश्रम घेऊन हे गारूड मराठी वाचकांसमोर उभे केले, 

याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! 

वसंत आबाजी डहाके

  • आय.एस.बी.एन. नं. : 978-81-91469-02-3
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२३
  • मुखपृष्ठ आणि अंतर्गत मांडणी : चंद्रमोहन कुलकर्णी
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X८.५"
  • बुक कोड : L-03-2023
  • पृष्ठ संख्या : १४४
  • वजन : १८८
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)