Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Jagana Hoil Hiravagar | जगणं  होईल हिरवंगार

Jagana Hoil Hiravagar | जगणं होईल हिरवंगार

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी व्रत घेतल्याप्रमाणे

आजपर्यंत मुलांसाठी कविता, गाणी, गोष्टी असं सकस

बालसाहित्य लिहिलं आहे. साहित्य अकादमीसह अनेक

महत्त्वाच्या पुरस्कारांची मुद्रा त्यांच्या साहित्यावर उमटलीय.

बालसाहित्यात अशी बालप्रियता, प्रौढांनीही प्रिय होऊन

त्यांचे केलेले सन्मान, वृत्तपत्रांनी प्रसिध्द केलेले साहित्य ...

या सा-यांतून त्यांच्या मन:पूर्वकतेचा अनुभव येतो. त्याच

मन:पूर्वकतेनं त्यांनी प्रौढ वाचकांसाठी आपलं ह्रद्ग्त व्यक्त

करण्यासाठी प्रस्तुतचा 'जगणं होईल हिरवंगार' हा

कवितासंग्रह लिहिला आहे.

माणूस, निसर्ग, शाळा आणि पाखरांसारखी मुलं हे एकनाथ

आव्हाड यांचं भावजीवन. त्यातही आई हे त्यांचं परमदैवत.

आईचं काळीज आपल्या कवितेतून नेमक्या आणि हृदयस्पर्शी

शब्दांतून व्यक्त करताना त्यांचा विशुद्ध आत्मस्वर आपल्याला

ऐकू येतो. आईच्या आणि मुलांच्या संदर्भात लिहिलेल्या

कविता वाचताना वाटतं, की या कवीमध्ये एक मूल आहे,

एक सुजाण शिक्षक आहे आणि छोटे साने गुरुजीही आहेत.

माणुसकीवरील प्रगाढ श्रद्धेमुळं जीवनाकडे पाहताना त्यांना

'जगणं होईल हिरवंगार' असं वाटणं नैसर्गिक आहे.

माणुसकीचा अमर्याद आशावाद उराशी बाळगणाऱ्या एकनाथ

आव्हाड यांना अशाच प्रेरक लेखनासाठी माझे शुभाशीर्वाद.

मधु मंगेश कर्णिक

ISBN: 978-93-48736-16-1
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२६
  • मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
  • राजहंस क्रमांक : B-03-2026 (1238 )
M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save ₹ 16 (10%)