Helapeshi | हेलापेशी
ही आहे हेन्रीऐटा लॅक्स. शंभर वर्षांपूर्वी जन्मलेली, ऐन तारूण्यात वॅâन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री. पण स्वत:च्याही नकळत तिने संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली – ‘हेला’पेशींची ! कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात उपयुक्त ठरलेल्या ‘हेला’पेशी. या पेशी जगभरात पसरल्या, अगदी अंतराळात पोहोचल्या. पण हेन्रीएटा मात्र उपेक्षेच्या अंधारात राहिली. एकीकडे संशोधनातील यशाची शिखरे, अब्जावधी डॉलरची उलाढाल; तर दुसरीकडे सामाजिक उतरंडीतील गोरा वर्चस्ववाद, कृष्णवर्णीयांना मिळालेली अमानुष वागणूक. ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी, वैद्यकसत्ता अन् मानवी प्रवृत्ती या साऱ्यांचा वेध घेणारी अमत्र्य पेशींची खरीखुरी कहाणी…
- पहिली आवृत्ती - सप्टेंबर २०२१ सद्य आवृत्ती - सप्टेंबर २०२१ Illustrator - तृप्ती देशपांडे