Goshtivelhal | गोष्टीवेल्हाळ
'कथेसाठी कठीण दिवस असताना हा वाड्मयप्रकार समर्थपणे हाताळणा-या आजच्या मोजक्या कथालेखकांपैकी मधुकर धर्मापुरीकर हे महत्वाचे नाव. आशय - विषयानुरूप लेखनशैली, कथेला विनोदी होऊ न देता कथेतला विनोद सांभाळणे आणि अनुभवांचा अगदी वेगळ्या प्रकारचा निवडलेला परिसर ही धर्मापुरीकरांच्या कथांची महत्वाची वैशिष्ट्ये. आजची कथा ही आशय-अनुभवाच्या दृष्टीने परिपक्व होत आहे, मात्र त्याकडेच अधिक लक्ष दिल्याने तिच्या गोष्टीरुपाला धक्का पोचतो आहे. मधुकर धर्मापुरीकर यांची कथा त्यांच्या कथनशैलीमुळे आपले गोष्टीरूप सांभाळून उभी असते. धर्मापुरीकारांची कथा वाचनीय होते आणि लक्षणीय ठरते ती यामुळेच. '
ISBN: 978-81-7434-522-6
- बाईंडिंग ; कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०११
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०११
- मुखपृष्ठ ; रवि मुकुल'