फाळणीचे हत्याकांड | Falniche Hatyakand | फाळणीचे हत्याकांड
'बघता बघता आपल्या स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली. आपले स्वातंत्र्य आणि त्याच वेळी देशाची झालेली फाळणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू. तथापि एकूण स्वातंत्र्यलढ्याबद्दल आपल्याकडे जेवढा अभ्यास केला गेला आहे, तेवढा फाळणीबद्दल, त्यावेळी घडलेल्या हिंसाचाराबद्दल आणि अभूतपूर्व स्थलांतराबद्दल मात्र झालेला नाही. ज्येष्ठ सनदी अधिकारी (माजी केंद्रीय गृहसचिव) माधव गोडबोले यांनी ‘द होलोकॉस्ट ऑफ इंडियन पार्टिशन : अॅगन इन्क्वेस्ट’ या आपल्या ग्रंथामध्ये मात्र फाळणीची सर्वांगीण व सखोल चिकित्सा केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्व संबंधित नेत्यांच्या चरित्रांमधील तो १८ महिन्यांचा कालखंड बारकाईने तर अभ्यासला आहेच, पण असंख्य सरकारी कागदपत्रांचा, अहवालांचा, फायलींवरील टिपणांचासुद्धा धांडोळा घेतला आहे. एखाददुस-या नेत्याला जबाबदार धरण्याऐवजी असंख्य गुंतागुंतीचे घटक प्रकाशझोतात आणले आहेत. कसल्याही अभिनिवेशाच्या आहारी न जाता त्यांनी केलेली मांडणी म्हणूनच विचारांना चालना देणारी ठरली आहे. माधव गोडबोले यांच्या त्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा त्यांच्या पत्नी सुजाता गोडबोले यांनी केलेला हा मराठी अनुवाद. '
- बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
- आक्कर : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००७
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'