
Chitralekha | चित्रलेखा
'पाप म्हणजे काय पुण्याची व्याख्या कशी करणार ?
की पाप किंवा पुण्य - असं काही नसतंच ?
असतो तो फक्त बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातील फरक ?
सामाजिक नियमांच्या चौकटीनुसार न वागणं,
त्या चौकटीला आव्हान देत ती मोडणं -
म्हणजे पाप ठरेल का ?
योगी आणि भोगी यांच्यात नेमका फरक काय ?
भोगी मनुष्य आसक्तीचा त्याग करू शकत नाही,
तशी योग्यालाही त्यागाची आसक्ती असतेच ना ?
माणसांच्या जीवनातील वास्तव घटनांचा आधार घेऊन
मानवी संस्कृतीतील चिरंतन मूल्यांचं विश्लेषण करणारी
साहित्यात अन् हिंदी रुपेरी पडद्यावर गाजलेली कादंबरी -
चित्रलेखा.
श्रेष्ठ हिंदी साहित्यिक भगवतीचरण वर्मा यांच्या
या अभिजात कादंबरीचा मराठी अनुवाद
चित्रलेखा'
ISBN: 978-81-946438-5-2
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०२०
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : राहुल देशपांडे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- बुक कोड : K-02-2020