Astitvavad aani marathi kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी

Astitvavad aani marathi kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी

'पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अस्तित्ववादी विचारसरणाने क्रांतीच घडविली. या घटनेचे श्रेय कीर्केगार्ड, नीत्शे, यास्पर्स, मार्सेल, हायडेगर, काम्यू व सार्त्र यांच्याकडे जाते. अस्तित्ववादाने सुमारे चारेक दशके पाश्चिमात्य जगतातील साहित्यनिर्मिती, समीक्षादृष्टी व कलाविचार यांवर आपली कायमची मुद्रा उमटविली. दोन महायुध्दांच्या आसपासचे राजकीय-सामाजिक वातवरण , स्तब्ध झालेला धर्मविचार, उद्ध्वस्त समाजमानस आणि बेभरवशाचे व्यक्तिजीवन यांचा अस्तित्ववादाच्या उदयाशी व विकासाशी जवळचा संबंध आहे. १९६० ते १९८० या कालावधीत मराठी साहित्य व समीक्षा यांवरही अस्तित्ववादाचा प्रभाव होता. रेखा इनामदार-साने यांनी अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी या ग्रंथामधून अस्तित्ववादाच्या उदयाशी तसेच जडणघडणीची नेटकी मीमांसा केली आहे. तसेच आस्तिकता-नास्तिकता, निवडीचे स्वातंत्र्य, परात्मता, असंगतता, अस्सल जीवनसरणी इत्यादी अस्तित्ववादी आशयसूत्रांचा सप्रमाण उलगडा केला आहे. तत्वज्ञान आणि साहित्य यांमधील परस्परसंबंधाची सूक्ष्म चिकित्सा करून मराठी कादंबरीविश्वात मूलगामी परिवर्तन घडविणा-या कोसला, बॅरिस्टर अनिरूध्द धोपेश्वरकर, पुत्र, सात सक्कं त्रेचाळीस, एन्कीच्या राज्यात या कादंब-याचे अस्तित्ववादाशी असणारे नाते त्यांनी विश्लेषणपूर्वक स्पष्ट केले आहे. अस्तित्ववाद आणि कादंबरी या दोहोंचे सांगोपांग विवरण करणारा हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. '

ISBN: 978-81-7434-295-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००४
  • सद्य आवृत्ती : सप्टेंबर २००४
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)