
I.T tach Jaychay | आय.टी.तच जायचंय
आय.टी. म्हणजे भारतीय उद्योग-व्यवसायाला सापडलेला
एक समृद्ध खजिना. अब्जावधी रूपयांच्या या खजिन्याच्या
गुहेची किल्ली शोधण्याचे सुरू होते एक स्वप्नरंजन - सर्वांचेच !
आय.टी. म्हणजे काय ? त्यासाठीचे अभ्यासक्रम कोणते ?
प्रवेशपरिक्षा कशा असतात ? इंजिनीअर झाले, तरी कोणत्या
चाचण्या व मुलाखतींना सामोरे जावे लागते ?
आय.टी.तली मंडळी करतात तरी काय ?
त्यातल्या संधी कोणकोणत्या ? अगदी सर्वसाधारण व्यक्तिला
आय.टी.त जाता येते काय ? इथे अपयश का येते ?
अशा सा-या प्रश्नांची नेमकी उत्तरे तीन तज्ज्ञ लेखकांनी
त्यांच्या समृद्ध अनुभवांतून येथे दिली आहेत.
जागतिक स्तरावरच्या ‘आयफ्लेक्स’ व ‘ओरॅकल’
या कंपन्यांचे ‘बिग बॉस’ दिपक घैसास यांच्या
नेटक्या प्रस्तावनेची त्याला जोड लाभली आहे.
ISBN: 978-81-7434-717-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००८
- सद्य आवृत्ती : मे २०१४
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : H-05-2008