Aandhalyachya Gayi | आंधळयाच्या गायी
'घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो! जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळयाच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...! आणि आंधळा? तो तर फक्त या भोळया विश्वासाची बासरी वाजवत राहतो. '
ISBN: 978-81-7434-184-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २०००
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२४
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'