...Aani Vidyechya Bailala  | ...आणि विद्येच्या बैलाला |

...Aani Vidyechya Bailala | ...आणि विद्येच्या बैलाला |

लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; 

केवळ वयानं वाढलेला मंदबुध्दीचा तरुण असो वा आईपण 

जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही 

पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा 

महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी... हरत-हेची माणसं 

आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत 

असतात. संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या 

जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या 

कथेतून सहज जाणवतं. लाटकरांची कथा गेल्या चार-दोन 

वर्षांतलीच; पण ती नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. 

आकार लघुकथेचा असो वा कादंबरीचा; बदलत्या काळाचे, 

बदलत्या समाजजीवनाचे चित्रण ती समर्थपणे करते. 

तिच्यातील विविधता, तिची मांडणी लक्षवेधक आहे; 

मराठी रसिकास दखल घ्यावयास लावणारी आहे; 

अपेक्षा वाढविणारीही आहे. 

ISBN: 978-81-7434-214-0
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००१
  • मुखपृष्ठ : पुंडलिक वझे
  • राजहंस क्रमांक : I-02-2001
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)