Amhala Vagala | आम्हाला वगळा

Amhala Vagala | आम्हाला वगळा

संझगिरी आणि माझी दोस्ती उणीपुरी चाळीस वर्षांची. 

आमच्या (फिल्मी) आवडी, आमची नट-नट्या - संगीतकार - 

गायक यांच्याविषयाची मतं, आमचे आदर्श हे तंतोतंत जुळतात. 

फरक एवढाच (आणि तो केवढा तरी मोठा!) की तो हे सगळं सुरेख 

पद्धतीनं शब्दबद्ध करू शकतो, त्याच्या खास शैलीत 

वाचकांपर्यंत पोचवतो. मी फक्त ‘मला हेच तर म्हणायचं होतं', 

असं मनाला समजावू शकतो. मला (आणि माझ्यासारख्या 

हजारो वाचकांना, रसिकांना) त्यानं लिहिलेलं मनोमन 

पटतं आणि खूप आवडतं. आवडावं, असंच तो लिहितो. 

कारण त्याला फिल्मी जगतातल्या लोकांबद्दल कुतूहल 

तर आहेच, शिवाय त्याचा त्याविषयीचा अभ्यास आहे, 

त्याची निरीक्षणं आहेत, हळवं करणाऱ्या आठवणी आहेत, 

त्यातले बारकावे (बऱ्याचदा गॉसिप्सही) त्याला माहीत आहेत. 

त्यामुळे या लोकप्रिय फिल्मस्टार्सबद्दलचं त्याचं - गप्पा 

मारल्यासारख्या, रसाळ आणि मिश्कील शैलीतलं - लेखन 

अत्यंत वाचनीय झालं आहे. 

दिलीप प्रभावळकर 

मेहमूद, किशोरकुमार, प्राण, हेलन या सर्वार्थानं 

मोठ्या कलाकारांच्या द्वारकानाथ संझगिरी यांनी 

खास त्यांच्या स्टाईलनं सांगितलेल्या गोष्टी 

आम्हाला वगळा...

ISBN: 978-93-95483-01-8
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२२
  • बाईंडिंग :कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • मुखपृष्ठ : सतीश भावसार
  • छायाचित्रे : राष्ट्रीय फिल्म संग्रहालय
  • मांडणीसाहाय्य : तृप्ती देशपांडे
  • राजहंस क्रमांक : J-01-2022
M.R.P ₹ 290
Offer ₹ 261
You Save ₹ 29 (10%)

More Books By Dwarkanath sanjhagiri । द्वारकानाथ संझगिरी