जन्म : ३ नोव्हेंबर १९७४, पुणे
शिक्षण : राज्यशास्त्र या विषयातील पदवीधर.
* शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कालावधीत अनेक स्पर्धातून पारितोषिके.
* पं. सत्यदेव दुबे यांच्या तालमीत अभिनयाचे धडे. पुरुषोत्तम करंडकादी स्पर्धेसह प्रायोगिक रंगभूमीवर आणि 'सर, सर,सरला..' पासून काही निवडक व्यावसायिक रंगभूमीवर कला सादर.
* व्हाईट लिली, नाईट रायडर' नाटकाच्या निमित्ताने 'सो कुल प्राॅडक्शन' च्या नावाने निर्मितीक्षेत्रात पदार्पण.
* गिरीश कार्नाड यांच्या 'चेलुवी ' या कन्नड चित्रपटातील भूमिकेने चित्रपटसृष्टीत पदार्पण (१९९२)
* 'मुक्ता', 'दोघी', दायरा', 'घराबाहेर', देउळ', रेस्टॉरंट', 'रिंगा, रिंगा, रिंगा', 'दिल चाहता है', 'मिशन काश्मीर',टॅक्सी नंबर ९२११', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', डॉ. प्रकाश आमटे', अशी ७० हून अधिक चित्रपटांतून भूमिका आणि उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर', 'स्क्रीन' पासून राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार.