शिक्षण- एम.ए. (मराठी), एम.ए. (शिक्षणशास्त्र), बी.एड.
* महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार, सन २०१५-१६
* आजीव सदस्य, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद.
संपर्क - ९४२१०९८१३०
ई–मेल -samadhanvs@gmail.com
ब्लॉग -www.shikshansanvad.in
प्रकाशित पुस्तके : माझा विद्यार्थी, पोपटाची पार्टी (बालकविता संग्रह)
*** लेखन, संपादन व निर्मिती
१. किशोर, जीवन शिक्षण यांसारख्या विविध शैक्षणिक मासिकांमध्ये नियमितपणे शैक्षणिक लेखन.
२. शासनाच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये अभ्यासगट सदस्य म्हणून सहभाग.
३. शासनाच्या मुक्त विद्यालय मंडळामध्ये अभ्यास गट सदस्य म्हणून सहभाग.
४. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, मार्फत प्रकाशित होणार्या जुलै २०१९च्या जीवन शिक्षण मासिकाच्या संपादनात सहभाग.
५. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबादममार्फत सन २०१९-२० साली प्रकाशित झालेल्या ‘सिद्धी’ व ‘वेध’ या विशेषांकांमध्ये कार्यकारी संपादक म्हणून सहभाग.
६. उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘पोत’ स्मरणिकेत लेखन.
*** राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम
१. सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश निर्मिती.
२. वाचन चळवळीला बळ, गती मिळावी, यासाठी लोकसहभागातून ग्रंथालय समृद्धी उपक्रम.
३. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचा, सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम.
४. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांनी पत्रे लिहिण्याचा पत्रलेखन उपक्रम.
५. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार, समृद्धी व अभिवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविलेले आहेत.