 
        
                राजीव यशवंत साने: स्वातंत्र्यवादी-प्रगतिवादी विचारवंत   (जन्म १४ जून १९५६) - आंतरविद्याशाखीय अभ्यासक 
*  शैक्षणिकपात्रता: बी.ई.(इलेक्ट्रीकल) पुणे विद्यापीठ, एम.ए.(समाजशास्त्र)
***  व्यावसायिक अनुभव: 
*  इंजिनीयर टेल्को, 
*  कोऑर्डिनेटर ज्ञानेश्वर विद्यापीठ, 
*  कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, 
*  उद्योगात विधायक सुधारणा सुचवणाऱ्या `ऑप्शन पॉझिटिव्ह’ चे संस्थापक
***  चळवळींत सहभाग: 
*  रोजगार हमी मजुरांचे संघटन, 
*  सातारा येथे पूर्ण वेळ औद्योगिक कामगार संघटक, त्या व इतर संघटनासाठी वाटाघाटी, करार, खटले इ.चालविणे 
***  धोरण चिकित्सा (पॉलिसी अडव्होकसी) : आर्थिक-सुधारणा, विकासप्रकल्प, नवे तंत्रज्ञान या गोष्टींचे समर्थन, अर्थक्रांती प्रस्तावाचे विश्लेषण
***  साहित्य: पुस्तके 
१)  “गल्लत गफलत गहजब”  राजहंस प्रकाशन  {या ग्रंथाला तत्वज्ञान-मानसशास्त्र विभागाचा राज्य-पुरस्कार}
२)	 “नवपार्थह्रुदगत:एक आधुनिकतावादी गीताचिंतन”  प्रतिमा प्रकाशन  
      (या ग्रंथाला तत्वज्ञान-मानसशास्त्र विभागाचा राज्य-पुरस्कार}
      {इहवादी-अध्यात्मिक चिंतनावर पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठान पारनेरकर महाराज  यांचेकडून  २०१५ चा ‘प्रज्ञावंत’ पुरस्कार} 
३)   “युगांतर: समाजवादी भांडवलशाहीकडून व्यक्तिवादी श्रमशाहीकडे” राजहंस प्रकाशन  {या ग्रंथाला इतिहास-समाजशास्त्र विभागाचा राज्य-पुरस्कार}
४)	  “या कॉम्प्यूटरमध्ये दडलंय काय?” राजहंस प्रकाशन  {या ग्रंथाला ग्रंथालीचा विज्ञान साहित्य पुरस्कार}
५)  “नव्या मनाचे श्लोक’ जे. कृष्णमूर्ती यांचे विचार भुजंगप्रयात वृत्तात मांडणारे  पुस्तक
***  साहित्य: लेखमाला 
१)	 “गल्लत गफलत गहजब”  दै. लोकसत्तातील लेखमाला दर शुक्रवार एडिट पेज
२)	 “कवडसे” दै. सकाळ
३)	 “आधुनिकता आणि दार्शनिक निवड” सा. सकाळ
४)	 “युगांतर” सा. सकाळ
५) “मर्मजिज्ञासा” सा. सकाळ
६) “गेटमीटिंग” सा. सकाळ
७) “थर्ड शिफ्ट” दै. सकाळ
***  ब्लॉग : विविध विषयांवर मराठी तसेच इंग्लिश मधून लेखन. 
       http://rajeevsane.blogspot.in/ 
       http://rajeevsane-english.blogspot.in/
    
‘*  जागतिकीकरण’, `नर आणि मादी: जनुकीय हितसंबंध’, ‘जी एम बियाणे: मिथक आणि वास्तव’, ‘जागतिक तापमानवाढ: प्रलयघंटावाद’, ‘कुमार गंधर्व: पारंपारिक रागात शोधलेल्या नव्या वाटा’ ‘मद्य: आसक्तीपेक्षा अवैधता भयंकर’, ‘प्रणयातील दारिद्र्य आणि निशिद्धतांचे पावित्र्य’ (बारबाला बंदी संदर्भात), असे अनेक विविध नियतकालिकांतून  वर्तमानपत्रातून उदा. आजचा सुधारक, समाज प्रबोधन पत्रिका, मिळून सार्याजणी, पुरुष उवाच, सकाळ, लोकसत्ता, लोकमत इ.,  चतुरस्त्र लेखन.   
*  किस्त्रीम दिवाळी अंकात लिहिलेला “ज्वलंत स्वदेशी, साधक आणि बाधक” हा राजीव दीक्षित यांच्या मांडणीची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला.
*  याशिवाय झुंडशाही, भ्रष्टाचार, जनानुरंजन, प्रशासकीय सुधारणा अशा विषयांवर मूलगामी चिंतनपर लेखन
 
*  तत्वज्ञानात “स्वातंत्र्य-केंद्री राजकीय विचार”, “इहवादी-आत्मविद्या” “आधुनिकोत्तर उच्छेवादाचे खंडन” इ विषयांवर  स्वतंत्र-चिंतन. गणित, विज्ञान व तंत्रज्ञान यातील मूलगामी सिद्धांतांविषयी उलगडा करणे व कूटप्रश्न बनवणे
*  संगीतात स्वतःच्या गीतरचना/संगीतरचना, नोटेशनसह संगीतसमीक्षा  
  
https://www.youtube.com/watch?v=zqRJJY-xxe0
            
 
                             
      
                                 
             
             
             
            