* कविता अरुण भालेराव - मुक्त विज्ञान पत्रकारिता, चरित्र लेखन, सूचिकार
* जन्मतारीख: २ नोव्हेंबर १९५८
* शिक्षण: बी. एस्सी ,बी. लिब. एस्सी.
*** काही प्रकाशित साहित्य :
* जिज्ञासेतून विज्ञान * मैत्री करूया पर्यावरणाशी
* शोधांचे शोध * तंत्रज्ञानाची मुळाक्षरे (भाग १ व २)
* पेशीबद्ध जीवन (अनुवाद) * माझा यंत्रमानव मित्र रोबा (अनुवाद)
* गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर
* मराठांचा इतिहास : ग्रंथसूची
*** पुरस्कार :
* INDIAN PHYSICS ASSOCIATIONचा विज्ञान प्रसाराचा प्रो. मो. वा. चिपळूणकर पुरस्कार.
* ‘गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर’ या पुस्तकासाठी :
* स्व. मिलिंद संगोराम स्मृती पुरस्कार.
* ग्रंथोत्तेजक सभा, पुणे पुरस्कार
* ‘मराठ्यांचा इतिहास : ग्रंथसूची’ या ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म. म. दत्तो वामन पोतदार पुरस्कार.
*** अन्य नोंदी :
* कोश कामांमध्ये सक्रीय सहभाग :
* भारतीय समाजविज्ञान कोश : पुरवणी खंड आणि पारिभाषिक खंड
* पुणे शहराचा ज्ञानकोश
* शब्दानंद शब्दकोश
* सूचीची कामे :
* २५हून अधिक वैचारिक ग्रंथासाठी संदर्भ सूची
* ‘ सृष्टिज्ञान’ (१९२८) या मराठीतून विज्ञान विषयांचे लेखन प्रकाशित करणार्या आद्य मासिकाची कार्यकारी संपादिका.
*** संस्थात्मक कामे :
* व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित प्राथमिक आणि अनाथालय येथील विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित शिबिरांमध्ये सक्रीय सहभाग.
* मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमांमध्ये विशेष सहभाग