* डॉ. अजित केंभावी एक नामवंत खगोलशास्त्रज्ञ आहेत. पुण्यातील आयुका सेंटरचेही ते संस्थापक-सदस्य आहेत.
* कर्नाटकातील हुबळी येथे १९५० मध्ये अजित केशव केंभावी यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठाच्या रुईया कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्रात बीएससी आणि एमएससी पदवी घेतली. पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेतून प्रा. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी मिळवली. त्यानंतर तेथेच संशोधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पदव्युत्तर पदवीनंतरच्या संशोधनासाठी त्यांना केंब्रिजच्या खगोलशास्त्र इन्स्टिट्यूटची फेलोशीपही मिळाली होती.
* १९८८ मध्ये स्थापन झालेल्या पुण्यातील आयुका या संशोधन केंद्रात ते सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २००९ मध्ये ते या केंद्राचे संचालक झाले. या पदावर त्यांनी ऑगस्ट २०१५ पर्यंत काम केले. सध्या ते या केंद्राचे मानद प्राध्यापक आहेत. त्यांच्या संशोधनात त्यांनी आकाशगंगा आणि अवकाशातील तत्सम बाबींवर लक्ष केंद्रित केले होते. तीस मीटरची दुर्बीण आणि लिगो इंडिया प्रकल्पावरही त्यांनी काम केले. केंभावी यांनी आभासी वेधशाळा या भारतीय प्रकल्पाचे नेतृत्व केले. या प्रकल्पाचे व्यवस्थापन, विश्लेषण आणि सादरीकरण यासाठी त्यांनी सुमारे १५ वर्षे योगदान दिले. या व्यतिरिक्त विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) माध्यमातून इन्फोनेट प्रोग्राम सुरू करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे भारतातील विद्यापीठांना शैक्षणिक नियतकालिकांमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वापरणे सोयीचे झाले.
* जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या विभागीय केंद्राच्या सहकार्याने राबविल्या जात असलेल्या माहिती प्रकल्पाचे ते सध्या प्रमुख आहेत. ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेचे उपाध्यक्षही आहेत. केपटाउनमधील खगोलशास्त्र विकास कार्यालयाचे अध्यक्ष म्हणून, तसेच बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात.
* डॉ. केंभावी भारतातील तिन्ही विज्ञान संस्थांचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञांसाठी यूजीसीतर्फे दिला जाणारा हरी ओम पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचे १०० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. खगोलशास्त्रात पीएचडी करणार्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. विज्ञान सोपे करून सांगण्याच्या त्यांच्या इंग्रजी, मराठी आणि हिंदीतील व्याख्यानांबद्दलही ते लोकप्रिय आहेत.
*** डॉ. मंगला नारळीकर
डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.
*** शिक्षण
* मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली.
* १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.
*** अध्यापकीय कारकीर्द
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.
* इ.स. १९६७ ते १९६९ : केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.
* मुंबई विद्यापीठात व नंतर पुणे विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले.
* इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल येथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.
* संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.
* इ.स. १९८२ ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले.याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
* इ.स. १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले.
* इ.स. २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.
* सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.
* त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.
*** डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
* A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर
* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
* गणितगप्पा (भाग १, २)
* गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
* नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर) : (खगोलविज्ञानविषक)
* पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)
* Fun and fundamentals of mathematics, Universities press
*** पुरस्कार
* बी.ए. (गणित) मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६२
* एम.ए. (गणित) पदवीसाठी कुलगुरूंचे सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६४