एम.डी., आय.पी.टी. कार्डिऑलॉजी
हृदयरोगतज्ज्ञ, संस्थापक / राष्ट्रीय प्रमुख आरोग्य सेना, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत
उच्च वैद्यकीय शिक्षण ग्रँट मेडिकल महाविद्यालय आणि जे. जे. रुग्णालय, मुंबई. एम.डी. परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण.
भारतातील आणि परदेशांतील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये हृदयरोगविषयक प्रशिक्षण आणि अनुभव.
पुण्यातील अनेक वैद्यकीय संस्था आणि रुग्णालयांमध्ये मानद हृदयरोग तज्ञ म्हणून कार्य.
हृदयरोगविषयक अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्व. १९८८ पासून गेली ३६ वर्षे पुण्यात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्य.
समाजवादी आणि पुरोगामी चळवळीचे विचारवंत आणि नेते म्हणून मान्यता. देशभरातली अनेक समाजवादी संस्था संघटनांशी घनिष्ट संबंध.
आरोग्यविषयक प्रश्न आणि अन्य सामाजिक समस्यांच्या संदर्भात विविध आंदोलने, लढे आणि सर्वेक्षणे.
जागतिक साहित्य, तत्त्वज्ञान, समाजकारण, अर्थकारण, कला, चित्रपट यांचा व्यासंग.
भारत यात्रा भारताचे माजी पंतप्रधान श्री. चंद्रशेखर यांच्या कन्याकुमारी ते दिल्ली या पदयात्रेत काही महिने डॉक्टर म्हणून सहभाग (१९८३).
भारत यात्रा आरोग्य चिकित्सा केंद्र (आर.एम.आर.सी.) भारत यात्रा केंद्र, परंदवडी, ता. मावळ, जि. पुणे या ग्रामीण तज्ज्ञ चिकित्सा केंद्राची स्थापना (१९९०). १९९८ पर्यंत १४० गावांमधील हजारो रुग्णांवर उपचार.