यशवंत मराठे : मराठे उद्योग समूहाच्या तिस-या पिढीतले व्यावसायिक म्हणजे यशवंत मराठे. नीरजा फाऊंडेशनचे ते विश्वस्त आहेत.
गावपातळीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगकरता ते कार्य करतात. बंधारे बांधणं, मोडकळीस आलेल्या बंधा-यांची दुरुस्ती करणं, विहिरींची दुरुस्ती करणं आणि तलाव स्वच्छ करणं; ही सर्व कामं त्या संस्थेमार्फत भारताच्या ग्रामीण भागात केली जातात.
मराठे हे उत्तम ब्लॉगर आहेत. `सरमिसळ' हा त्यांचा मराठी ब्लॉग अतिशय प्रसिद्ध असून त्या अंतर्गत संस्कृती, घडामोडी, तत्त्वज्ञान, भूतकाळाची ओढ, शब्दचित्रं आणि प्रवास अशा विविध विषयांवर ते लेखन करतात. `हिस्ट्री कॅफे' या त्यांच्या इंग्लिश ब्लॉगमधून ते इतिहासाचा आढावा घेतात. त्यांच्या वेचक मराठी लेखांचं `छपाई ते लेखणी' हे पुस्तक डिसेंबर २०२०मध्ये प्रकाशित झालं आहे.
त्यांची सहज, सोपी, अनौपचारिक भाषा, विश्लेषणात्मक तरी विनोदी अंगानं जाणारं लेखन वाचकांना अतिशय प्रिय आहे.
लेखकाचे विचार
गेल्या दोन वर्षांच्या आमच्या परिश्रमांना आज मूर्तऊश्प येताना पाहून आनंद झाला आहे. या कालावधीत मी कित्येक रात्री झोपेवाचून तळमळत घालवल्या आहेत. कित्येकदा मी निराश तर कित्येकदा अतिउत्तेजित झालो आहे. या प्रवासादरम्यान माझा हात घट्ट धऊश्न ठेवणाNया सर्वांचे आभार मानण्याची वेळ आली आहे.
सतीश मुटाटकर यांच्याशी माझी गाठभेट घालून देणा-या परेश सुखटणकर यांचे आभार सर्वप्रथम मानायला मला आवडेल. त्यांनी मध्यस्थी केली नसती, तर आज हे पुस्तक प्रत्यक्षात आलंच नसतं. भगवान जोशी आणि चिन्मय ठकार या दोघांनी माझ्या अनेक कल्पनांवर अत्यंत स्पष्ट आणि कुठलाही पूर्वग्रह न बाळगता अभिप्राय दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. या पूर्ण
लेखनप्रवासादरम्यान अनेक मित्रांनी सातत्यानं प्रोत्साहन दिलं आहे.
प्रत्येकाचं नाव घेणं अशक्य असलं, तरी सर्वांचे एकत्रितरीत्या आभार मानतो. माझं कुटुंब तर माझ्यामागे खंबीरपणे उभं होतंच, परंतु अदिती माझा मोठा आधारस्तंभ ठरली. ती माझी उत्तम टीकाकारही होती. मी या लेखनप्रवासातून ढळू नये, म्हणून सर्व कुटुंबीयांनी सतत मदत केली. त्यांचेही आभार. आणि
हो, माझा नातू अरिन याचा मला विशेषत्वानं उल्लेख करावासा वाटतो. आमच्या जीवनात त्याचा प्रवेश झाल्यामुळे या पुस्तकाला प्रत्यक्षात आकाराला येण्यासाठी आणखी काही महिने जरी द्यावे लागले, तरी त्याबद्दल माझी कुठली तक्रार नाही.
श्री. सतीश मुटाटकर या माझ्या सहलेखकांचे आभार मानल्याशिवाय मी शेवट कसा कऊश्? मनानं खेळाडू, व्यवसायानं इंजिनीयर, नंतरच्या आयुष्यात उत्तम इंग्लिश आणि हिंदी लेखक, गीतकार, टीव्ही सीरिअल, टीव्ही कमर्शिअल आणि कॉर्पोरेट फिल्म तयार करणारे ते एक अत्यंत बुद्धिवंत कलाकार आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. हे पुस्तक कथारूपांनं
तुमच्यापर्यंत येण्यामागे त्यांचाच हात आहे. त्यांचे विशेष आभार.
माझ्यासारख्या अनेकांना प्रेरित करणारे माझे वडील कै.. सुरेश मराठे यांना मी हे पुस्तक अर्पण करतो.