आयआयटी मुंबई या संस्थेतून बीटेक आणि एमटेक या पदव्या घेतल्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, क्वालिटी, ट्रेनिंग आणि ह्युमन रिसोर्सेस विभागांमधे सर्वोच्च पदांवर काम.
प्रकाशित साहित्य :
कादंबरी : The Takeover (इंग्रजी), युनायटेड आयर्न अँड स्टील, सिंफनी
कथासंग्रह : पाऊल वाजे, द बॉस इज ऑल्वेझ राइट
इंग्रजी पुस्तक परीक्षण : हा ग्रंथसांगरू येव्हडा
चरित्र : स्टीव्हन हॉकिंग, अर्नेस्ट हेमिंग्वे
अनुवाद : Gandhi and His Critics (मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद)
'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता', 'सामना', 'साधना', 'ललित', 'लोकमुद्रा', 'साहित्य सूची', 'श्री दीपलक्ष्मी', 'पुण्यनगरी', 'अंतर्नाद', 'साप्ताहिक सकाळ' या नियतकालिकांमधून पुस्तक परीक्षण, आर्थिक आणि राजकीय घडामोडी, अनुवाद अशा प्रकारचे लेखन
'दीपावली', 'मौज', 'अक्षर', 'वसा', 'अंतर्नाद', 'तरुण भारत', 'साहित्य सूची', 'मुक्त शब्द', 'प्रतिबिंब', 'साहित्य', 'हेमांगी', 'श्री दीपलक्ष्मी' या नियतकालिकांमधून कथा/कादंबरी लेखन
चरित्र, कथा, कादंबरी, कविता, निबंध, समीक्षा अशा लेखनासाठी विविध साहित्य पुरस्कार