विश्वास नांगरे पाटील (१ जून १९७३) हे भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्याआधी ते नाशिक शहराचे पोलिस आयुक्त होते. पाटील यांनी १९९७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले.
* २०१५ मध्ये त्यांना २००८ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवादविरोधी कारवायांमधील त्यांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले.
*** २६/११चा दहशतवादी हल्ला
२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते.[ सोबत दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच(बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले. सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरू होती.
*** कारकीर्द
* अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक(अज्ञात दिनांक - २८ नोव्हेंबर २००५)
* पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक(२९ नोव्हेंबर इ.स. २००५ - ३ जून इ.स. २००८)
* मुंबई पोलीसदल उपायुक्त (४ जून इ.स. २००८-
* ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
* अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभाग
* नाशिक पोलीस आयुक्त
* सद्यस्थितीत पोलीस सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था), मुंबई
*** पुरस्कार
राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३)