नाव: विजय वसंतराव पाडळकर
जन्म : ४-१०-१९४८ बीड, मराठवाडा.
महाराष्ट्र बँकेत तीस वर्षे सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती. कथा, कादंबरी, ललित लेखन आणि चित्रपट आस्वाद अशा विविध क्षेत्रात गेल्या तीस वर्षांपासून लक्षणीय लेखन. आजवर २६ स्वतंत्र आणि सहा अनुवादित पुस्तके प्रकाशित. सत्यजित राय आणि गुलजार यांच्या चित्रपटांचा विशेष अभ्यास. ‘माध्यमांतर-साहित्यातून चित्रपटाकडे' या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपट अभ्यासाच्या दिशेचा वेध घेणारी सहा पुस्तके प्रकाशित. स्वतंत्र पुस्तकांपैकी पाच पुस्तकांना विविध साहित्य प्रकारांत महाराष्ट्र राज्य पारितोषिके मिळालेली आहेत.
{यापैकी कोणत्याही एका साहित्यप्रकारात दोन पेक्षा अधिक पुरस्कार नाहीत.]
याशिवाय ‘केशवराव कोठावळे पुरस्कार’,
* ‘आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्कार’, ‘
* वाल्मिक पुरस्कार’, ‘बी. रघुनाथ पुरस्कार' आणि
‘* नरहर कुरुंदकर पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
अध्यक्ष:
* लातूर जिल्हा साहित्य संमेलन [१९९६] आणि
* ठाणे जिल्हा साहित्य संमेलन [२०१०]
* महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून सहभाग.
* संस्थापक: मॆजिक लॅन्टर्न फिल्म सोसायटी, नांदेड
* पिंजरा’ या लघुपटाची निर्मिती.
* महाराष्ट्रात विविध ठिकाणी अभिजात जागतिक साहित्य,
* हिंदी सिनेसंगीत व चित्रपट रसास्वादावर व्याख्याने.
.