पुणे विद्यापीठात १९६० साली दुसरा क्रमांक मिळवून प्रथम वर्गात बी.ई. (सिव्हील) पदवी प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवून राज्यशासनाच्या पाटबंधारे विभागात सरळ सेवा वर्ग-१ मध्ये प्रवेश.
* पाटबंधारे विभागात १९६१ सालापासून काम करताना लघु, मध्यम आणि मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांचे अन्वेषण, संकल्पन, उभारणी आणि सिंचनव्यवस्थापन या सर्व प्रकारच्या कामांचा ३४ वर्षांचा अनुभव.
* नोकरीच्या काळात जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्यातून चालू असलेल्या योजनेतून फिलिपीन्समध्ये १९८१-८२ साली तांत्रिक सल्लागार म्हणून एक वर्ष काम.
* सन १९८८ मध्ये अमेरिकेत जलसंपत्ती विकास प्रणालींबद्दलचे साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण.
* मे १९९२ मध्ये ब्राझील देशातील कार्यशाळेत शोधनिबंध सादर.
* राज्यातील दोन मोठ्या धरणांच्या अभ्यासातून ‘धरणे आणि पर्यावरण’ हे पुस्तक १९९२ साली शासनातर्फे प्रकाशित.
* जून-जुलै १९९५मध्ये इंडोनेशिया येथील आधुनिक सिंचन प्रकल्पाचा मूल्यांकन अहवाल लिहिण्याच्या कामाचा अनुभव. नोकरीच्या काळात अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि शोधनिबंधांचे सादरीकरण.
* नोव्हेंबर १९९५ अखेर सचिव पाटबंधारे म्हणून सेवानिवृत्त.
* सेवानिवृत्तीनंतरच्या काळात परदेशातील ११ आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रात पेपर आणि पोस्टर यांचे सादरीकरण करून सक्रीय सहभाग.
* देशात भरलेल्या बर्याच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांचे सादरीकरण.
* गेल्या २५ वर्षात बर्याच शासन नियुक्त समित्यांवर सभासद आणि अध्यक्ष म्हणून काम करताना पाण्यासंबंधीच्या विविध क्षेत्रातील अनुभव.