डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६ पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. रसाळ हे सन १९९० ते १९९३ या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते.
*** ग्रंथसंपदा
* कविता आणि प्रतिमा
* कवितानिरूपणे
* काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली
* ना.घ. देशपांडे यांची कविता
* मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण
* मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप
* मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्म वाङ्मय
* लोभस : एक गाव काही माणसंं (व्यक्तिचित्रे)
* वाङ्मयीन संस्कृती
* समीक्षक भालचंद्र नेमाडे
* साहित्य अध्यापन आणि प्रकार : सहसंपादन (प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरवग्रंथ)
*** पुरस्कार व मानसन्मान
* अशोक कीर्तकीर पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे दिला जाणारा गौरवमूर्ती पुरस्कार
* चारठाणकर प्रतिष्ठानचा पुरस्कार
* मराठवाडा साहित्य परिषदेचा १ला जीवनगौरव पुरस्कार
* प्रा. रा.श्री. जोग पुरस्कार
* पद्मजा बर्वे पुरस्कार
* ’वाटा कवितेच्या' कार्यक्रमात दिला जाणारा, परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा २०१४ सालचा शब्द सह्याद्री साहित्य सन्मान
* साहित्य समीक्षा पुरस्कार
* अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्कार (२०२१)
डाॅ. वसंत सीताराम पाटणकर यांचा जन्म २० जानेवारी १९५१ रोजी झाला. मराठीत स्वतः कवी असून कवितेचे समीक्षक असलेले जवळजवळ नाहीतच. पण एकोणीसच्या सत्तरच्या दशकात स्वतः आधुनिक जाणिवेचे कवी म्हणून नावारूपाला आलेले पाटणकर एकीकडे कविता लिहीत असतानाच, दुसरीकडे कवितेच्या समीक्षेशीही जोडलेले राहिले. एवढेच नाही, तर प्रसंगी त्यांनी कविता लिहायची थांबवली, पण कवितेसंबंधीचा त्यांचा विचार मात्र सुरूच राहिला. त्यामुळेच आजवर ‘विजनातील कविता’ हा एकच कवितासंग्रह त्यांच्या नावावर जमा आहे.
*** अध्यापकीय कारकीर्द
वसंत पाटणकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापनाचे कार्य केले.
*** ग्रंथसंपदा
* अरुण कोलटकरांची कविता
* कविता : संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा
* कवितेचा शोध
* ग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न
* द.ग.गोडसे यांची कलामीमांसा
* विजनांतील कविता
* साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या
* स्वातंत्र्योत्तर मराठी कविता १९४५-६०
*** पुरस्कार
१. 'यशवंत दाते स्मृती संस्थे’तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. भा.ल. भोळे’ पुरस्कार‘कवितेचा शोध’ या समीक्षात्मक पुस्तकाला देण्यात आला.
*** डॉ. वसंत पाटणकर
* वसंत पाटणकरांनी कवितेची एकसत्त्ववादी संकल्पना मोडीत काढून तिच्या विविध उपप्रकारांना आपल्या विचारव्यूहात स्थान देत कवितेची समग्रतालक्ष्यी मांडणी केली.
* आत्मपरतेबरोबर अनात्मपरता हाही कवितेचा गुण असू शकतो, हे पाटणकर यांना जाणवले. त्यातून कवितेतील आत्मपरता आणि अनात्मपरता या भेदाला अग्रक्रम देत पाटणकर यांनी कविता या साहित्यप्रकाराची एक नवी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे.
* कवितेच्या लयबद्धता, सांगीतिकता, अनेकार्थक्षमता, प्रयोगशीलता, वैचारिकता अशा वेगवेगळ्या पैलूंचा विचार त्यांनी या नव्या व्यवस्थेअंतर्गत केला आहे. ही व्यवस्था लावताना त्यांनी कवितेसंबंधी मराठीत झालेला विचार, संस्कृत साहित्यशास्त्र, पाश्चात्य साहित्यशास्त्र यांचा यथायोग्य आधार घेतला आहे.