Home / Authors / Shripad Bhalchandra Joshi | श्रीपाद भालचंद्र जोशी
Shripad Bhalchandra Joshi | श्रीपाद भालचंद्र जोशी
Shripad Bhalchandra Joshi | श्रीपाद भालचंद्र जोशी

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

* ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत, वक्ते म्हणून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही परिचित. संवादशास्त्र व माध्यमशाशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून लौकिक.

** प्रकाशित साहित्य
• कवितासंग्रह : • सळाळ आणि सळाळ नंतर.. • समांतर • मथितार्थ
• इत्यादि • सर्ग • समाक्रांत • आतून तुटलेली माणसे • उलट्या काळजाची माणसे.

** ललित : • हवी तशी नक्षी • तो, ती, ते आणि तो

** लेखसंग्रह : • हस्तक्षेप • युगसंवाद • आकलन

** संवाद व माध्यमविषयक : • फ्रंटिअर्स ऑफ कम्युनिकेशन • संवादशास्त्र • संवादाची मूलतत्त्वे • जनसंवाद आणि जनमाध्यम : सैद्धांतिक संकल्पन • सुसंवाद : इतरांशी, स्वत:शी • माध्यम, पत्रकारिता आणि आपण
• माध्यमांचा अन्वयार्थ • माध्यमांची नीतीमत्ता • मिडिया एथिक्स • मास मीडिया : कम्युनिकेशन, थिअरी, रिसर्च अँड कल्चर • ज्ञानेश्वरी : संवादशास्त्रीय आकलनाचा एक प्रयत्न • प्रसारमाध्यमांची स्वायत्तता : किती खरी? किती खोटी? • वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र : एका वादाची सद्य:स्थिती • जागतिकीकरण, संवाद-माध्यमे आणि फेरमांडणीचे नवे आव्हान

** एकांकिका संग्रह : द चिमण्या, टरफले आणि सहगल आणि इतर एकांक • सुवर्णपर्वतापल्याड आणि इतर एकांक.

** विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवर स्तंभलेखन आणि स्फुट लेखन.

** संपादन : • युगवाणी • श्रीवत्स • मराठी ग्रामसेवक • `साहित्य जत्रा' पुरवणी, दै. लोकमत

** संपादित ग्रंथ : • मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान • प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध : शतकोत्तर आकलन • नवसमाजासाठी...
* आफ्रिकन लोककाव्य, पॅलेस्टाईनचे कवी महमूद दरवेश, हिंदी कवी श्रीकांत वर्मा, बाबा नागार्जुन, नोबेल पुरस्कार प्राप्त विसेंत अलेक्झांडर, रवींद्रनाथ टागोर इ. कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद.
* ‘सळाळ आणि सळाळ नंतर..’ या कवितासंग्रहाचे हिंदी, इंग्रजी, बंगाली, मल्याळम, कन्नडमधून अनुवाद.

*** सन्मान
* अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष : २०१६-१९.
* अध्यक्ष : जन सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान.
* अध्यक्ष : विदर्भ सांस्कृतिक परिषद.
* उपाध्यक्ष : सुमारे तीस वर्षं, विदर्भ साहित्य संघ.
* अध्यक्ष : १२ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, येळळूर (कर्नाटक).
* अध्यक्ष : गाडगेबाबा साहित्य संमेलन, जरूड.
* अध्यक्ष : पहिले साहित्य-संस्कृती संमेलन, सावनेर.
* अध्यक्ष : बोली साहित्य संघाचे पहिले कविता संमेलन, नागपूर.
* अध्यक्ष : पहिले लेखक-प्रकाशक संमेलन, भिलार.
* संपादक : युगवाणी, सुमारे दहा वर्षे.
* संपादक : `साहित्य जत्रा', रविवार पुरवणी, दै. लोकमत, सुमारे सात वर्षे.
* नागपूर जिल्हा साहित्य संघाचे कार्याध्यक्ष.
* ‘महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी’, ‘मराठीच्या भल्यासाठी’, ‘मराठीच्या व्यापक हितासाठी’ चळवळ, ‘विश्व मराठी परिषद’ व अखंड महाराष्ट्र समिती’चे प्रवर्तक, संस्थापक, प्रमुख संयोजक.
* महाराष्ट्रातील पथनाट्य चळवळ, समांतर कला आंदोलनाचे प्रवर्तक.
* राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य.
* सव्र्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीच्या मध्यभारत शाखेच्या गोखले संवादमाध्यम अध्ययन-संशोधन संस्थेचे मानद संचालक.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे पहिले पूर्ण वेळ माजी भागप्रमुख.
* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्वत्सभेवर तीन वर्षे संवाद-माध्यम तज्ज्ञ.
* अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी व्याख्याते, निबंध लेखक म्हणून आमंत्रित.
* अनेक शिबिरे, प्रशिक्षणे, कार्यशाळांचे आयोजन-मार्गदर्शन.
* `यथार्थ' : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी गौरवग्रंथ
(संपादक : डॉ. श्रीपाल सबनीस)

*** पुरस्कार
* शरच्चंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ : ‘सळाळ आणि सळाळनंतर...’.
* ‘द पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसायटी’ पुरस्कार, ट्रांस आशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
* य. खु. देशपांडे शास्त्रीय लेखन पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ : ‘जनसंवाद आणि जनमाध्यम : सैद्धांतिक संकल्पन’.
* सुरेश भट स्मृती साहित्य पुरस्कार, राष्ट्रीय पुस्तक मेला.
* कविवर्य बापूसाहेब ढाकरे वाड्मय पुरस्कार : ‘हस्तक्षेप’.
* यशवंतराव दाते स्मृती काव्य पुरस्कार : ‘समायत’.
* शांताराम आठवले मराठी आग्रही पुरस्कार, मराठी अभ्यास केंद्र, मुंबई.
* आशीर्वाद पुरस्कार, मुंबई.
* प्रबोधन पुरस्कार, प्रबोधन प्रकाशन, नागपूर.

Shripad Bhalchandra Joshi | श्रीपाद भालचंद्र जोशी ह्यांची पुस्तके