* गेल्या तीन दशकांपासून पत्रकारितेत असलेले श्रीधर लोणी हे सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.
शिक्षण, विज्ञान, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांच्या अभ्यासाचे विषय असून, त्यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
‘* महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘बेरीज वजाबाकी’ या ब्लॉगवर त्यांचे लेखन उपलब्ध आहे.
* त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून एमएस्सी केले आहे.
* पत्रकारितेच्या पदवीसह त्यांनी बीबीसी या वृत्तसंस्थेचा पर्यावरण पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
* मेघनाद साहा यांचे छोटेखानी चरित्र त्यांनी लिहिले आहे;
* तसेच ‘साहित्य संचित’ हा ग्रंथ सहसंपादित केला आहे.
* वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कारासह, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संपादनक्षेत्रातील पुरस्काराचे ते मानकरी आहेत.