* डॉ. शैलजा बापट ह्या 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' येथील संस्कृत-प्राकृत भाषाविभाग येथील निवृत्त प्राध्यापक.
* त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या दर्शनांच्या ग्रंथांचे विशेष अध्ययन-अध्यापन केले.
* वेदान्त, बौध्द दर्शन, सांख्य, योग, न्याय ह्या दर्शनांच्या ग्रंथांतील विविध विषयांवर संशोधन करू इच्छिणा-या अनेक परदेशी व भारतीय विद्यार्थ्याना पीएचडी पदवीसाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
* 'ए क्रिटिकल एडिशन ऑफ दि ब्रह्मसूत्र' ह्या ग्रंथाला साहित्य अकादमीतर्फे 'भाषा सन्मान'(इ.स. २०१८) हा पुरस्कार प्राप्त झाला.
* वेदान्त दर्शनाच्या अव्दैत वेदान्त, विशिष्टाद्वैत इत्यादी प्रमुख दहा संप्रदायांच्या आचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील भाष्यांवर आधारित 'ए स्टडी ऑफ वेदान्त इन दि लाईट ऑफ ब्रह्मसूत्रज' हा त्यांचा ग्रंथ आणि 'अथातो ब्रह्मजिज्ञासा वेदान्त संप्रदायांमधील पूर्वोत्तर मीमांसा शास्त्र संबंधविषयक मीमांसा' ' हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
* शैलजा बापट यांना 'अंडरस्टँडिंग ऑफ गौतमबुद्ध - ॲज फिलाॅसाॅफर अँड टीचर' ह्या विषयावरील संशोधनासाठी, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे 'एमेरिटस फेलोशिप' प्रदान करण्यात आली. ह्या विषयाचा लघुप्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगास सादर केला. भारतीय दर्शनांमधील विविध विषयांवरील संस्कृत, इंग्लिश, व मराठीमधून संशोधनपर लेख संस्कृत, गुंजारव, परामर्श अशा प्रसिध्द पत्रिकांतून तसेच विशेषांक, गौरवग्रंथ इत्यादी मधून प्रसिध्द झाले आहेत.
* सध्या शैलजा बापट ह्या न्यायसूत्रवात्स्यायन भाष्याच्या भाषांतराचे काम करीत आहेत.