साधना (खडपेकर) बहुळकर
* जी. डी. आर्ट (१९७९)
* लोकसत्ता’ दैनिकात १९८०मध्ये ‘रंगरेषा’ या सदरात चित्रप्रदर्शनावरील अभिप्राय लेखनाने लेखनास आरंभ.
* नंतर ‘म. टाइम्स’, ‘मुंबई सकाळ’, ‘नवशक्ती’, या दैनिकातूनही कलाविषयक सदर लेखन आणि नैमित्तिक लेखन. दिवाळी अंक व नियतकालिकांसाठी सुप्रसिद्ध चित्रकार हेब्बर,
* बेंद्रे, प्रभाकर बरवे इत्यादींच्या मुलाखती. ‘अंतर्नाद’, ‘अनुभव’, ‘मिळून सार्याजणी’ या मासिकातून चित्रकलाविषयक विविध प्रकारचे लेखन. महाराष्ट्र साहित्य परिषद, विश्वकोश, दृश्यकला कोश, व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र, या कोशांमध्ये भारतीय व पाश्चात्त्य चित्रकारांवर नोंदी लेखन.
* कलासंस्थांच्या स्मरणिका व आर्ट गॅलरीजचे कॅटलॉग यामधून चित्रकलाविषयक विशेष लेखन.
* ‘चित्रायन’ हे चित्रकार माधवराव सातावळेकरांवरील चरित्रात्मक पुस्तक – २००६.
* पहिल्या दृश्यकलाकोशासाठी सहसंपादक – २०१३.
* `आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या कार्यकारिणीत २०१५ ते २०२१ मध्ये सक्रिय.
पुरस्कार :
* ‘चित्रायन’ या पुस्तकाला ‘कोकण मराठी साहित्य’ परिषदेचे पारितोषिक – २००५.
* ‘कलावर्त-कलान्यास’ या उज्जैनच्या संस्थेकडून चित्रकला लेखनाबद्दल ‘राष्ट्रीय वर्णपट सन्मान’ – २००६.
* चित्रकलालेखनासाठी मुंबईतील एशियाटिक सोसायटीची फेलोशिप प्राप्त – २०१५-१६