रविंद्र जातेगावकर
भारतात सिव्हील इंजिनियरींगमध्ये पदवी प्राप्त.
* नंतर मास्टर्सची पदवी ब्रिटनमधून आणि पीएच.डी पदवी कॅनडामधून संपादित.
* इंजिनियर म्हणून स्कॉटलंड आणि नंतर इंग्लंडमध्ये दहा वर्षे काम करून कॅनडास प्रयाण.
* गेली चाळीसपेक्षा जास्त वर्षे कॅनडात वास्तव्य.
* कॅनडात काही वर्षे एरॉनॉटिकल इंजिनियरींगच्या आणि नंतर न्यूक्लीयर इंजिनियरींगच्या क्षेत्रात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केल्यानंतर सेवानिवृत्त.
* कॅनडाहून उत्तर अमेरिकेतील श्रोत्यांसाठी दहा वर्षे ‘सप्तरंग' हा मराठी कार्यक्रम कॅनेडीयन एफएम रेडियोवरून प्रसारित.
डॉ. मधुमंजीरी मुकुलेश गटणे
पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी आणि पशुवैद्यकीय औषधशास्त्र आणि विषशास्त्र विषयांतील पीएच.डी. प्राप्त.
* पशुवैद्यकीय महाविद्यालयात तीस वर्षे अध्यापन केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती.
* आकाशवाणीवर मुलाखती घेणे तसेच शेतीसंलग्न विषयावरील संहितांचे लेखन.
* मुंबई दूरदर्शनवर अनेक कार्यक्रमांचे संचालन आणि दहा वर्षे वृत्तनिवेदन.
* निवृत्तीपश्चात अनुवाद, अभिवाचन, निवेदन, कविता, मुलांना गोष्टी सांगणे, प्रवास इत्यादी छंदांची जोपासना.
* मुलांकरिता ‘पंचतंत्राचे नवरंग' हे पुस्तक प्रकाशित