डॉ. रमेश रावळकर अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत.
* रमेश रावळकर यांनी हॉटेलमध्ये नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. हॉटेलमध्ये कामा करताना रावळकर यांनी हॉटेल कामगारांच्या समस्या स्वत: अनुभवल्या नि जवळून बघितल्या त्यामुळे ते खूपच अस्वस्थ झाले आणि टिश्यू पेपर कादंबरी आकाराला आली.
*** प्रकाशित साहित्य :
* मातीवेणा : रमेश रावळकर यांचा 'मातीवेणा हा पहिला कवितासंग्रह होय. शेतकरी, शेती, शेतमजूर याविषयीचे वर्णन या कवितासंग्रहात आहे.
* औरंगाबाद येथील गुलमोहर प्रतिष्ठानचा उत्कृष्ट कविता संग्रहाचा पुरस्कार प्राप्त झाला.
* गावकळा : गावकळा हा रमेश रावळकर यांचा दुसरा कवितासंग्रह . ओढगस्तीला आलेली शेती, तरुण मुलांचे शहरात जाऊन शेतीपासून दूर होणं आणि उद्या ही वडिलोपार्जित शेती कोणी कसायची ? हा हरेक बळीला सतावणारा प्रश्न इत्यादी विषयांवरच्या कवितांनी हा कविता संग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला.
* वैजापूर येथील साने गुरुजी प्रतिष्ठानचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार प्राप्त झाला.
* करंडा : लोकसंस्कृतीचे घट्ट धागे मनमानसी किती खोलवर रुतून बसलेले आहेत याची खूण पटविणारे हे लोकगीतांचे संपादन रमेश रावळकर यांनी केले आहे. मराठी बोलीचा शब्दाविष्कार प्रचंड ताकदीचा असून त्यात मानवी संबंध, भावभावना, स्वभाव प्रवृत्ती आणि नात्यांची बांधणी यांचे कलात्मक दर्शन घडते.
*** रमेश रावळकर यांना यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार प्राप्त झाला. आहे.
* औरंगाबादचा विनायकराव पाटील काव्य पुरस्कार
* कै. नामदेवराव गाडेकर काव्य पुरस्कार
*** टिश्यू पेपर कादंबरीला पुरस्कार
* तिफण नियतकालिकाचा तिफण सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
* सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक यांच्यावतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
* प्रसाद बन, नांदेड सर्वोत्कृष्ट वाड्मय पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा ह.ना. आपटे पुरस्कार
* मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद यांचा बी. रघुनाथ पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा भोसरी व महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार
* सूर्यांश साहित्य पुरस्कार, चंद्रपूर
* जे के जाधव पुरस्कार, वैजापूर
* लेखकाचा दूरध्वनी ९४०३०६७८२४