क्लोज एनकाउंटर्स' हे पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांचे प्रसिद्ध पुस्तक. व्यक्तिचित्रणे असलेली मराठीतील दोन गाजलेली पुस्तके म्हणजे पु.ल. देशपांडे यांचे 'व्यक्ती आणि वल्ली' आणि जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे'. या दोन्ही पुस्तकांतील व्यक्तिचित्रणांना तोडीस तोड अशी व्यक्तिचित्रणे 'क्लोज एनकाउंटर्स' हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे या पुस्तकातील सर्व व्यक्ती बेर्डेंना मुंबईच्या कामाठीपुरातील सोळा गल्ल्यांमध्ये भेटल्या आहेत.
पुरुषोत्तम बेर्डे हे जेजेमध्ये असताना संस्थेच्या नोटीस बोर्डावर 'बोरीबंदरचा बेरड' या नावाने समीक्षणे लिहीत असत.
पुस्तकाचे पहिले प्रकरण हे नागपाड्याच्या नाक्यावरच्या 'ॲलेक्झांड्रा' या सिनेमागृहाबद्दल आहे. या थिएटरबद्दल अरुण पुराणिक यांनीही एक लेख लिहिला आहे.
*** पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांना मिळालेले पुरस्कार
* 'अलवार' नाटकासाठी राज्य स्तरावरील व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
* इंडियन नॅशनल थिएटरचा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता म्हणून गौरव
* 'जाऊबाई जोरात' या नाटकासाठी (सन २०००मध्ये मिळालेले) २७ पुरस्कार
* 'तावीज' चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्यपुरस्कार आणि भारत सरकारचा पुरस्कार
* पी सावळाराम पुरस्कार (२०१०)
* पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ३० वर्षांच्या नाट्यसेवेसाठी नाशिक नाट्य परिषदेचा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार (२००३)
* 'भस्म' चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्यपुरस्कार आणि भारत सरकारचा पुरस्कार
* 'हमाल दे धमाल' चित्रपटासाठी चार राज्य पुरस्कार