Home / Authors / Prof. DR. Nitin Karmalkar | प्रा. डॉ. नितीन करमळकर
Prof. DR. Nitin Karmalkar | प्रा. डॉ. नितीन करमळकर
Prof. DR. Nitin Karmalkar | प्रा. डॉ. नितीन करमळकर

प्रा. डॉ. नितीन करमळकर

*** सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुऊश् (२०१७-२०२२) असलेले प्रा. डॉ. नितीन रघुनाथ करमळकर हे शिक्षणक्षेत्रातील एक बहुपैलू, समृद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

* पुणे विद्यापीठातून एमएससी आणि पीएचडी (१९८८) या पदव्या संपादन केल्यानंतर त्यांनी भूगर्भशास्त्र व पर्यावरणशास्त्र यात दीर्घकाळ अध्यापन व संशोधन कऊश्न जिओसायंटिस्ट म्हणून नावलौकिक मिळवला.

* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या विभागांचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते.

* संशोधनातील गुणवत्तेमुळे मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, मैसुरू यांच्यातर्फे प्रा. सी. नागण्णा सुवर्णपदक देऊन प्रा. करमळकर यांचा गौरव करण्यात आला.

* त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पीएचडी संपादन केली. सध्याही दोन संशोधक डॉक्टोरल आणि पोस्ट-डॉक्टोरल पदव्यांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया व जर्मनीत संशोधन करीत आहेत. जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस अशा अनेक नामवंत संस्थांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे.

* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी अध्यापन व संशोधनाखेरीज अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदार्‍याही पार पाडल्या.

* १८ मे २०१७ रोजी त्यांची या विद्यापीठाचे कुलगुऊश् म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रेयांक पद्धती
(क्रेडिट सिस्टम) विकसित करण्यात आली आणि संशोधनासाठी जऊश्र ती यंत्रणा, विद्यापीठाची उपकेंद्रे आणि कौशल्य विकास केंद्र यांचे बळकटीकरण करण्यात आले.

* पोस्टडॉक्टोरल फेलोशिप प्रोग्रॅम विद्यापीठात त्यांच्या मार्गदर्शनाने सुरु झाला. एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन, रीसर्च पार्क फाउंडेशन यांची स्थापना त्यांच्या नेतृत्वाने झाली.

त्यांच्या कुलगुरुपदाच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळाले आणि विद्यापीठाच्या गुणवत्ता मूल्यांकनात (रँिंकग) मोठी प्रगती झाली. याच काळात त्यांनी सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या प्रभारी कुलगुऊश्पदाचा अतिरिक्त कार्यभारही काही काळ सांभाळला.

* कन्सॉर्शियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन या संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणूनही ते तीन वर्षे कार्यरत होते.
फ्रान्स आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान द्विपक्षीय शैक्षणिक संबंध विकसित करणार्‍या सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांची नियुक्ती केली.

* इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) दिल्ली, यांचे सदस्यत्व त्यांनी तीन वर्षांसाठी भूषविले. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओसायन्सेस, लखनऊ याचे अध्यक्ष म्हणून त्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली.

* त्यानंतर त्यांना आता आणखी तीन वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. आघारकर संशोधन संस्थेची पालक संस्था असलेल्या
महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीचे ते उपाध्यक्ष आहेत.

* नव्या शैक्षणिक धोरणाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाल्यानंतर त्यासाठीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली व तो कार्यभार ते कार्यक्षमतेने हाताळत आहेत.



मंगला गोडबोले
जन्म : २ फेब्रुवारी १९४९
शिक्षण : बी.ए. (मराठी/मानसशास्त्र), एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई; १९६८
एम.ए. (मराठी / भाषाशास्त्र) मुंबई विद्यापीठ, १९७०
एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक, नॅशनल स्कॉलरशिप,
दक्षिणा फेलोशिप यांसह, न. चिं. केळकर सुवर्णपदक प्राप्त.
कार्यभार : महिला महाविद्यालय, विलेपार्ले इथे अध्यापन, १९७०-७१
‘स्त्री’ मासिकात संपादन साहाय्य, १९८०-८४
‘माहेर’ मासिकात संपादन साहाय्य, १९८८-२०१०
पुरस्कार : उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती- महाराष्ट्र शासन
* वयात येताना : १९८६-८७
* अल्बम : १९९९-२०००
* अशी घरं... अशी माणसं : २००१-२००२
* काय तुझ्या मनात? : २००४-२००५
* पर्स हरवलेली बाई : २००५-२००६
* पण बोलणार आहे : २००९-२०१०
* सही रे सही : २०१०-२०११
* ऋतू हिरवट : २०१४
* सती ते सरोगसी : २०१८
महाराष्ट्र साहित्य परिषद
* पुन्हा झुळूक : चिं. वि. जोशी पुरस्कार- उत्कृष्ट विनोदी पुस्तक,१९८९
* ‘निरोप’ (लेख) : अनंत काणेकर पुरस्कार- उत्कृष्ट ललित गद्य, १९९०
* सौ. शांताबाई शिरोळे पुरस्कार, लक्षणीय लेखिका, २००१.
* सही रे सही : वि. वि. बोकील पुरस्कार- बालसाहित्य,२०१०

इतर पुरस्कार
* वर्धापनदिन पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय, १९९८.
* सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, १९९९.
* यशोदाबाई शिरुडे पुरस्कार, कोथरूड उपनगर साहित्य संमेलन, २०००.
* आडवळण : सार्वजनिक वाचनालय, नाशिक, वि. मा. दी.पटवर्धन पुरस्कार, २००१.
* दिवा : उत्कृष्ट लेखिका पुरस्कार, २००४.
* ब्रह्मवाक्य : मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार,२००४.
* साहित्य क्षेत्राचा जीवनगौरव पुरस्कार, वनिता समाज, दादर,२००९.
* पण बोलणार आहे : अभिरुची गौरव पुरस्कार,
मराठी वाङ्मय परिषद, बडोदे, २०११
* साहित्यिक कामगिरीचा जीवनगौरव पुरस्कार,अ‍ॅड. डी. आर. नगरकर फाउंडेशन, पुणे, २०१४.
* पुणे महानगरपालिका साहित्य पुरस्कार, २०१८
* पुणे मराठी ग्रंथालयाचे कै. सरोजिनी शारंगपाणी पारितोषिक, २०१९
* साहित्य प्रतिष्ठानचा कथादीप पुरस्कार, २०२२
* साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, २०२२
* जीवनगौरव पुरस्कार २०२४ : सार्वजनिक वाचनालय कल्याण, इत्यादी.

आकाशवाणीवर विपुल लेखन व नभोनाट्यांच्या अखिल भारतीय स्पर्धेत दोन नभोनाट्यांची निवड, त्यांचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद.
काही लेखन हिंदी, गुजराती, इंग्रजी व कानडी भाषेत अनुवादित.
बालभारतीच्या मराठी गद्यपद्यसंग्रहात लेखनाचा समावेश.

Prof. DR. Nitin Karmalkar | प्रा. डॉ. नितीन करमळकर ह्यांची पुस्तके