प्रकाश मुजुमदार
* हे मूळचे भंडा-याचे . त्यांनी बी.एस्सी ची पदवी नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून घेतली.
* पुढे त्यांनी बी.टेक. (केम. इंजीनियरिंग) ची पदवी 'लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी' मधून १९६२ साली घेतली.
* सुरुवातीची काही वर्षे 'नेपा पेपर मील व ऑर्डन्स फॅक्टरी मध्ये काम केल्यानंतर १९६७ साली ते त्रिवेंद्रमला अणुशक्ती विभागाच्या 'अंतरीक्ष शास्त्र व प्रौद्योगिक केंद्रात रुजू झाले.
* प्रणोदक अभियांत्रिकी विभागात प्रणोदक अभियंता म्हणून त्यांनी डॉ.वसंतराब गोवारीकरांबरोबर ह्या प्रणोदक विकासाच्या कार्यक्रमात अगदी प्राथमिक स्तरावरून कामाला सुरुवात केली.
* हा प्रकल्प श्रीहरीकोटा ह्या ठिकाणी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारला गेला. हा प्रणोदक निर्मितीप्रकल्प (Solid Propellant Space Booster Plant) जगातील काही मोजक्याच प्रकल्पांत गणला जातो व आज ह्या प्रकल्पात तयार होणारी १२५ टनी रॉकेट मोटार (PSLV) चा पहिला टप्पा) जगातील तिसरी/चवथी मोठी मोटार म्हणून गणली जाते.
* त्यांनी डॉ. अब्दुल कलामांबरोबरही प्रणोदक विकास, slv-3 तसेच PSLV च्या कामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
* डॉ. गोवारीकारांचे व मुजुमदारांचे प्रणोदक निर्मितीप्रकल्प आजही इस्रोच्या PSLV व GSLV प्रक्षेपण यानाच्या कार्यक्रमात बहुमोलाची कामगिरी बजावत आहेत.