डॉ. पी. विठ्ठल (१९७५)
* नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आणि संशोधन–मार्गदर्शक असून नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी आणि समीक्षक आहेत. त्यांचे ‘माझ्या वर्तमानाची नोंद’ , ‘शून्य एक मी’ आणि ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘
* मराठी कविता: समकालीन परिदृश्य’ ,जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता’ ही समीक्षेची पुस्तके आणि ‘करुणेचा अंत:स्वर’ , ‘संदर्भ: मराठी भाषा’ , ‘समन्वयाचे क्षेत्र’ , ‘वर्तमानाचा उच्चार’ , ‘विश्लेषण’ हे लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.
* याशिवाय ‘वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध’ , ‘विशाखा : एक परिशीलन’ , ‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ , ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ , ‘शिक्षणवेध’ , ‘वैचारिक साहित्य’ इ. संपादने प्रसिद्ध आहेत.
* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘माहितीपर लेखन’ या अभ्यासपत्रिकेचेही त्यांनी लेखन केले आहे.
* साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक सन्मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
* महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश आहे.
* हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत त्यांच्या काही निवडक कवितांचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.
* महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे आणि शासन व्यवहार समितीचे ते सदस्य असून विविध विद्यापीठाच्या व स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासमंडळाचेदेखील ते सदस्य आहेत. मराठीतील सर्वच महत्त्वाच्या नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले आहे.
डॉ. पी. विठ्ठल
संपर्क : डॉ. पी. विठ्ठल,
प्राध्यापक, भाषा संकुल,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड ४३१६०६
मो. ९८५०२४१३३२