* २००८ - नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल क्वालिटी एक्सलंस ॲवाॅर्ड.
(भारत सरकारच्या विमायोजना गोरगरीब लाभार्थींपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा योग्य लाभ मिळवून दिला. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याचे पुण्यकर्म केल्याने सन्मान.
* २००९ - जेम ऑफ इंडिया (भारताचा हिरा)
हा पुरस्कार. नवी दिल्ली स्थित 'ऑल इंडिया अचिवर्स कॉन्फरन्स तर्फे सन्मान. भारतीय युवकांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून बेरोजगारांची समस्या सोडविण्यात योगदान दिल्याबद्दल पुरस्कार.
* इतिहास निर्माण करणारे झंझावाती वादळ : आत्मविश्वासाच्या बळावर प्रगतीचे उत्तुंग शिखर सर करणारे श्री. एन. बी. धुमाळ' अशा शब्दांत 'उद्योजक; मासिकाने गौरव केला.
* प्राईड ऑफ महाराष्ट्र ॲवाॅर्ड.
भारतातील प्रसिध्द माध्यम समूह 'दिव्यभास्कर' समूहाच्या दिव्यमराठी महाराष्ट्र तर्फे झालेला सन्मान. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा जाहारे व नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
* सकाळ माध्यम समूहाचा एक्सलंस ॲवाॅर्ड.
पद्मश्री पोपटराव पवार, नगराचे तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आ. संग्रामभय्या जगताप यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
* ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचा जीवनगौरव पुरस्कार.
* विश्वजयंती व बिझनेस कॉन्फरन्स, दुबई येथे ४ मार्च २०२० प्रा. नामदेवराव जाधव व दुबीतील नामांकित उद्योजकांच्या हस्ते सन्मान.
* २०१४ - रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचा उद्यमशीलता पुरस्कार.
* एलआयसी, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्या वतीने सीईओ श्री. निलेश साठे यांच्या हस्ते एकस्लंट वर्क ॲवाॅर्ड.
* दै. पुण्यनगरीचा 'प्रेरणादायी सूर्य' पुरस्कार.