महाबळेश्वर सैल (जन्म - ४ ऑगस्ट, इ.स. १९४३ माजळी, कारवार) हे गोव्यात स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत.
* त्यांचे कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.
* त्यांनी कोकणीत 'निसर्ग साहित्य' हा नवा प्रवाह सुरू केला.
* १९६५ च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सहभाग होता.
* १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर युनोतर्फे शांतिसैनिक म्हणूनही ते गेले होते.
*** महाबळेश्वर सैल यांचे प्रकाशित साहित्य
* उन्हातली माणसं (कादंबरी)
* काळी गंगा (लेखकाची ही पहिली कादंबरी)
* खोल खोल मुळा (कादंबरी)
* तांडव (कादंबरी- मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांतून लिहिलेली कादंबरी) राजहंस प्रकाशन, पुणे
* नको जाळूं माझं घरटं
* निमाणो अश्वत्थामा (शेवटचा अश्वत्थामा) (कथासंग्रह)
* हावठण (कादंबरी)
*** महाबळेश्वर सैल यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
* सरस्वती सन्मान