डॉ. माधवी मित्र
एम. कॉम.ला विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर 'कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील सज्ञापन' या विषयावर प्रबंध सादर करून पुणे विद्यापीठाची व्यवसाय व्यवस्थापन या विद्याशाखेतील पी.एच.डी. पदवी प्राप्त,
* किर्लोस्कर कन्सल्टंट लि. या व्यावसायिक सल्लगार संघटनेत 'व्यवस्थापन सल्लगार' (management Consultant) म्हणून पाच वर्षे काम.
* पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात ३० वर्षे अध्यापनाचे आणि काही काळ उपप्राचार्य म्हणून काम केल्यानंतर ऑक्टोबर २००१ मध्ये तेथून निवृत्त.
* जमशेदपूर येथील 'एक्स एल.आर. आय.' या नावाजलेल्या संस्थेत 'कर्मचारी व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध' या विषयाच्या प्राध्यापक म्हणून दोन वर्षे शिकविण्याचा अनुभव. या काळात प्रौढ शिक्षणावरील संशोधन प्रकल्पात आणि 'व्यवस्थापकीय प्रशिक्षण व विकास' कार्यक्रमात सहभाग.
* पुण्यात काही व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांतअध्यापन.
* 'बायजा' या स्त्री चळवळीस वाहिलेल्या द्वैमासिकाच्या संपादनात सहभाग.
* यापूर्वी 'व्यावसायिक व्यवस्थापन' तसेच 'कंपनी कायदा आणि चिटणीसाची कार्यपद्धती' या विषयांवरील इंग्रजी आणि मराठी भाषेतील पुस्तके प्रकाशित.
* कर्मचारी व्यवस्थापनावरील अनेक लेख इकोनॉमिक टाईम्स, फायनान्शियल एक्स्प्रेस, इतर व्यावसायिक मासिके, केसरी इत्यांदीमध्ये प्रसिध्द.
*** नाना शहाणे
* कर्नाटक युनिवर्सिटीची बी.ए. (ऑ.) पदवीघेतल्यानंतर बडोद्याच्या सयाजीराव युनिव्हर्सिटीची 'एम एस डब्ल्यू पदवी.
* काही काळ सरकारी नोकरीचा अनुभव. त्यानंतर पुण्यातील अनेक नावाजलेल्या कंपन्यांमध्ये पर्सोनेल मॅनेजर म्हणून काम.
* सर्व ठिकाणी कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात सुसंवाद घडवून आणून मैत्रीपूर्ण औद्योगिक संबंध निर्माण करण्याविषयी ख्याती.
* 'मनुष्यबळ व्यवस्थापनास' पुण्यातील औद्योगिक व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान.
* गेली वीस वर्षे 'इमकॉन असोसिएटस' या पुण्यातील ख्यातनाम, औद्योगिकसंबंधाच्या क्षेत्रातील सल्लागार संस्थेचे प्रणेते व प्रमुख. ही संस्था केवळ कामगार-मालक तंट्यामध्ये मध्यस्थी करण्याचे संकुचित ध्येय समोर ठेवत नाही तर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सौहार्दाचे संबंध निर्माण करण्यावर आणि ख-या अर्थाने मनुष्यबळ संवर्धनावर भर देते.