Home / Authors / Madhav Gadgil | माधव गाडगीळ
Madhav Gadgil | माधव गाडगीळ
Madhav Gadgil | माधव गाडगीळ

जन्मतारीख: २४ मे १९४२

शिक्षण: M.A Zoology, Mumbai University, 1965

हे जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.

*** शिक्षण
* माधव गाडगीळ यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुणे, मुंबई या विद्यापीठांतून जीवशास्त्राच्या पदव्या घेऊन नंतर हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात त्यांनी पीएच.डी मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत.

*** कारकीर्द
* इ.स. १९७३ ते २००४ पर्यंत माधव गाडगीळ बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हार्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत. शिवाय अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते.

* विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी माधव गाडगीळ यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल त्याचे अभिनव प्रयोग केले आहेत.

*** संशोधन
* लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. .

* जीवशास्त्र व पर्यावरण शास्त्रज्ञ, संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो.

* माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वतभागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे (गाडगीळ कमिशनचे) अध्यक्ष होते. भारतातल्या ’पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक आहेत.

* माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत.


*** लेखन
* डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

*** गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
* भारताच्या पश्चिम घाटातील पर्यावरणावरी केलेल्या अभ्यासाबद्दल नॅशनल एनव्हायरमेन्ट फेलोशिप
* १९८६ ते १९९० या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्यत्व
* १९९८पासून ते २००२पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व
* भारतीय विज्ञान अकादमीची व थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप.
* अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनीचे विदेशातले सदस्यपद
* ब्रिटिश आणि अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायटींचे मानद सदस्यत्व.
* जीवशास्त्रांसाठीचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
* विक्रम साराभाई पुरस्कार
* ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार
* हार्वर्ड विद्यापीठाचे अपूर्व असे शतवार्षिक पदक
* व्होल्व्हो आंतरराष्ट्रीय पारितोषिक (२००३)
* भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार
* कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
* विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अत्युच्च प्रावीण्याबद्दल फिरोदिया पुरस्कार (२००७)
* उष्णकटिबंधीय जीवशास्त्र आणि त्याचे संरक्षण या विषयांवर केलेल्या संशोधनात्मक कामगिरीसाठी ATBC (असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायॉलॉजी अँड कॉन्झर्व्हेशन) या संस्थेची मानद फेलोशिप (२०१०)
* पर्यावरणशास्त्रात केलेल्या कामगिरीसाठी सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा सन २०१५चा टायलर पुरस्कार Archived 2015-09-26 at the Wayback Machine. - Tyler Prize (2015)
* पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने समाजाच्या १४६व्या स्थापनादिनानिमित्त पुरस्कार (४-१२-२०१६)
माधव गाडगीळची प्रदीर्घ प्रस्तावना असलेल्या वारूळ पुराण या पुस्तकास मराठी साहित्य परिषदेतर्फे विशेष ग्रंथकार पुरस्कार २०१८
* उत्क्रांती: एक महानाट्य या पुस्तकास अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२०
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार २०२०
* उत्क्रांती: एक महानाट्य या पुस्तकास राठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान पुस्तक पुरस्कार २०२१

Madhav Gadgil | माधव गाडगीळ ह्यांची पुस्तके